बाबा…. जाऊ नको दूर! लेकिला शेवटची घट्ट मिठी मारणाऱ्या युक्रेनमधील या नागरिकानं साऱ्या जगाला रडवलं

नवी दिल्ली : russia Ukraine conflict रशियानं युक्रेनवर समुद्र, जमीन आणि हवाई मार्गानं हल्ला केलेला असतानाच मायभूमी युक्रेनमधून अनेक रहिवासी, नागरिक देश आणि त्यांची शहरं सोडून निघाले आहेत. सध्याच्या घडीला युक्रेनमधील अनेक व्हिड़ीओ आणि फोटो सर्वांना परिस्थिती किती बिकट आहे, याची जाणीव करुन देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या याच फोटो आणि व्हिडीओमध्ये एका दृश्यानं साऱ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. 

अतिशय भावनिक असा हा व्हिडीओ भाषा, प्रांत या साऱ्याच्या पलीकड़े जाऊन काळजात कालवाकालव करुन गेला. 

या व्हिडीओमध्ये युक्रेनियन नागरिक त्याच्या मुलीला मिठीत घेऊन रडताना दिसत आहे. बाबांपासून दूर जात असतानाच आपण मोठ्या संकटात असल्याची भीती त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत आहे. 

ही मिठी खुप काही सांगून जात आहे. आपल्या कुटुंबापासून पत्नी आणि मुलीपासून दूर होणाऱ्य़ा या व्यक्तीच्या दु:खाची जाणीव लगेचच आपल्याला होत आहे. 

कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी रवाना करणारा हा बाबा, देशाप्रती असणारी निष्ठा जपत तिथंच राहण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

युक्रेनवर मोठं संकट ओढावलेलं असतानाच नागरिकांची देशाप्रती असणाऱी ही भावना खऱ्या समर्पणाची अनुभूती करुन देत आहे. 

हेही वाचा :  Chatrpati Shivaji Maharaj letter : शिवप्रेमींसाठी खुशखबर ! छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं शेवटचं पत्र सापडलं...पाहा पहिला फोटो

दुसरीकडे युक्रेनमध्ये लागू करण्यात आलेल्या Martial Law मुळं देशातील 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यावर पूर्ण निर्बंध लावण्यात आले आहेत. ज्यामुळं अनेक कुटुंबामध्ये हा दुरावा आलेला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …