बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

प्रवीण तांडेलकर, झी मीडिया, भंडारा : बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.

मोहाडी तालुक्यांतील जांभोरा येथील शेतकरी ज्ञानेश्वर समरित यांच्याकडे 2 एकर शेती आहे. त्यांची बियाणे कंपनीकडून घोर फसवणूक झाली आहे. त्यांनी शेतात पिकवलेले धान 135 ते 140 दिवसात निघणारे होते. पण कंपनीच्या बियाणामुळे हे धान 80 दिवसात निघाल्याने आता शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

दर वर्षी ज्ञानेश्वर हे आपल्या शेतात 140 दिवसात निघणारे धान लागवड करतात. या वर्षी देखील त्यांनी पालोरा येथिल कृषि केंद्रातून 140 दिवसांत निघणार बायर कंपनीचा 6444 गोल्ड वाणाचा बियाणे खरेदी केली. पेरणी करुण धान लागवडदेखील केली. हे धान 140 दिवसात निघेल असे शेतकऱ्यांना माहिती होती. पण हे धान 80 दिवसातच निघाले असल्याने शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे. 

हेही वाचा :  RBI : तुमचे खाते 'या' बँकेत आहे का? RBI ने जारी केली असुरक्षित बँकाची यादी

समरित यांच्या शेती परीसरात तलाव असल्याने परिसरातील शेती नेहमी पाण्याखाली असते. त्यामुळे सर्व शेतकरी 140 दिवसात निघणारी धान लागवड करतात. पण त्यांचे धान 80 दिवसात निघाल्याने 10 दिवसात हेच धान कापणीला येणार आहे. 

परंतु शेतात पाणी असल्याने धान कापायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे यंदा त्यांच्या शेतात शेती पिकली खरी पण हातात अन्नाचा दाना देखील येणारं नाही. त्यामुळे आता बायर कंपनीने शेतीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

मी बायर कंपनीचे धान घेतले. 135 दिवसात धान येते पण 80 दिवसानी हे धान आले. त्यामुळे हे धान कापावे कसे हे कळत नाही. लोकांचे भारी धान आहे. माझे धान हलके लागले. मी याची तक्रार केली पण माझ्याशी कोणी संपर्क केला नाही. मला बायर कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर यांनी केली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …