चालकाची ‘ती’ चूक जीवावर बेतली, पुलाचा कठडा तोडून ट्रक खाली कोसळला अन् पेट घेतला, समृद्धीवर भीषण अपघात

गणेश मोहळे, झी मीडिया,

वाशिमः समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघाताचे सत्र अद्याप सुरूच आहे. वाशिम (Washim) जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अपघातानंतर ट्रकला (Truck Accident) आग लागली आणि त्यातच चालकाचा व क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (Truck Accident On Samruddhi Mahamarg Near Washim)

अपघातानंतर ट्रकला भीषण आग

वाशिम जिल्ह्यातील दोनद जवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. आग लागल्यानंतर जखमी असलेल्या चालकाना व क्लिनरला बाहेर पडायला संधी न मिळाल्याने त्यातच होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. 

चालकाला डुलकी लागल्यामुळं अपघात

सोमवारी रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरवरून पश्चिम बंगाल येथे ट्रक निघाला होता. समृद्धी महामार्ग लोकेशन क्र १७८ दोनदजवळ चालकाला डूलकी लागल्यामुळं ट्रकचा भीषण अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा :  'समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडणारे 'देवेंद्रवासी' होतात असं..., शरद पवारांचा घणाघात

ट्रक आगीने वेढला

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळं हा ट्रक समृद्धी मार्गाच्या मधोमध असलेल्या पुलाचे कठडे तोडून खाली कोसळला. कठड्याला घर्षण झाल्यामुळे डिझेलची टॅंक फुटली आणि ट्रकने भीषण पेट घेतला. आगीने वेढलेल्या ट्रकमधून बाहेर पडण्याची दोघांनाही संधी मिळाली नाही. त्यामुळं ट्रकमध्येच होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. 

दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवली

अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अग्निशामक दल व कारंजा शहर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. शहर पोलीस स्टेशन कारंजा व अग्निशमक दल कारंजा हे घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यास यश आले. आग इतकी भीषण होती की ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला झाला आहे. तर, ट्रकमध्ये असलेल्या कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

नाशिकमध्ये भीषण अपघात

नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेल संस्कृती समोर झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले आहेत. टायर फुटल्याने कार विरुद्ध दिशेवरील समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जाऊन धडकली. यात दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही संपूर्ण घटना cctv मध्ये चित्रित झाली आहे. नामदेव विठ्ठल शिंदे 36, सुनील मनोहर महाले 26, अशी मयत तरुणांची नावे आहेत. 

हेही वाचा :  राजकारणातली मोठी बातमी; ED चौकशी सुरु झाल्यावर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश

घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गंभीर जखमी युवकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारीने तपासून मयत घोषित केले.दरम्यान, सुनील महाले हे स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी होता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …