फेब्रुवारी 21, 2024
Breaking News
  • तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का? यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण का बाद झाले?
  • Buisness Idea: 30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात ‘अशी’ उभी केली 100 कोटींची कंपनी
  • महाराष्ट्रातील शिक्षकांची ‘या’ सक्तीच्या कामातून होणार सुटका? राज ठाकरे फक्त बोलले अमित ठाकरे थेट मंत्रालयात गेले
  • महाराष्ट्रातील अनोखे आश्रयस्थळ; प्रेमासाठी घरातून पळून आलेल्या जोडप्यांना येथे मिळतो आश्रय
  • TATA कंपनीचे स्पाय सॅटेलाईट थेट अमेरिकेतून अवकाशात झेप घेणार; भारतीय सुरक्षा यंत्रेणेला देणार गुप्त माहिती

तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे


उच्च शिक्षण विभागाचे निर्देश

पुणे : राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांना तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करावी लागणार आहे. त्या संदर्भातील निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी दिले आहेत.  तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने २०१९ मध्ये राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी राज्यातील राज्यातील अकृषी, अभिमत, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत. तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात वावरताना वेगवेगळय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ सर्वसामान्य विद्यार्थी तृतीयपंथी विद्यार्थ्यांशी मैत्रीभावना बाळगताना संकुचित भावना दर्शवतात, महाविद्यालयातील वसतिगृह वापराताना त्यांना अपमानित केले जाते. तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांनी त्यांना वेगळी वागणूक न देता सर्वसमावेशक पद्धतीचा अवलंब करावा. त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करावी. जेणेकरून त्यांना वैयक्तिक अपमान, अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही आणि शिक्षणाकडे अधिक लक्ष पुरवणे शक्य होईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

The post तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे appeared first on Loksatta.

हेही वाचा :  गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला पुण्याच्या हर्षद कोकाटेनं आस्मान दाखवलं

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …