Weight loss hacks : भात शिजवताना टोपात एक चमचा ‘ही’ एक गोष्ट घाला, आपोआप गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी..!


Edited By Pratiksha More |
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:

कमी कॅलरीजचे सेवन हा वजन कमी (Weight Loss) करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. पण असे करणे काही वेळा कठीण वाटू शकते. अनेकदा असे दिसून येते की बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे सेवन कमी करतात, विशेषतः भात खाणं टाळतात. साहजिकच भात खाण्याची इच्छा असते पण तसे करायला भाग पाडले जाते. जर आम्ही तुम्हाला सांगू की भात खाऊनही तुम्ही आरामात वजन कमी करू शकता. ही गोष्ट थोडी आश्चर्यकारक वाटेल, परंतु असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही भात शिजवताना त्यातील कॅलरी कमी करू शकता. ही खास गोष्ट तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात आरामात मिळवू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संशोधकही या गोष्टीला पाठिंबा देतात. तांदूळ शरीरात ग्लायकोजेनमध्ये रूपांतरित होतो यावर तज्ज्ञांचे मत आहे. व्यायाम किंवा कोणत्याही शारीरिक हालचालींनंतर भात खाल्ल्यास स्नायूंना ऊर्जा मिळते. असे न केल्यास ग्लायकोजेन लवकरच ग्लुकोज बनते आणि चरबीच्या रूपात शरीरात साठवले जाते. (फोटो साभार: TOI)

हेही वाचा :  CIDCO Lottery 2023 : नवी मुंबईत घर घ्यायचेय ! सिडकोची पुन्हा एकदा 5000 घरांसाठी लॉटरी

तांदळांत काय मिक्स केलं पाहिजे?

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्निया (USC) च्या मते, तांदळातील कॅलरीज कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे उकळत्या पाण्यात एक चमचे खोबरेल तेल घालणे आणि नंतर त्या पाण्यात भात सुमारे 25 मिनिटे शिजवणे. भात बनवल्यानंतर 12 तास फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवावा. असे केल्याने तांदळातील कॅलरीज 60 टक्क्यांनी कमी होतात. आहे की नाही हा सोपा मार्ग?

(वाचा :- Weight loss drink : अगदी वेगाने गळून पडेल संपूर्ण शरीरावरची चरबी, फक्त सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास या पदार्थाचं पाणी!)

भात बनवल्यानंतर थंड जरूर करावा

भाज बनवल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका आणि किमान 12 तास रेफ्रिजरेटरमध्ये थंड करा. संशोधकांचे म्हणणे आहे की भात थंड करणे आवश्यक आहे कारण जिलेटिनायझेशन दरम्यान अमायलोज (स्टार्चचा विरघळणारा भाग) दाण्यांना सोडून देतो.

(वाचा :- Gas remedy : थोडंसं खाल्यावरही पोट एकदम टम्मं भरलेलं वाटतं किंवा गच्चं होतं? करा हा उपाय 2 मिनिटात शरीरातील सर्व गॅस पडेल बाहेर!)

स्टार्चमुळे कसे कमी होऊ शकते वजन?

संशोधनानुसार, स्टार्च हा भाताचा घटक आहे आणि तो पचण्याजोगा किंवा अपचन होण्यासारखा दोन्ही प्रकारचा असू शकतो. असे मानले जाते की जेव्हा पचलेला स्टार्च रेसिस्टेंट स्टार्चमध्ये बदलतो तेव्हा वजन वाढणे टाळता येते. याचा अर्थ असे केल्याने कॅलरीज कमी होऊ शकतात.

हेही वाचा :  रेल्वे गोंधळली आणि जगाला मिळाली योग्य 'वेळ'; गोष्ट अशा गावाची जिथून चालतं संपूर्ण जगाचं घड्याळ

(वाचा :- सकाळी रिकाम्या पोटी हे फळ खाल्यास आतड्यांमधील घाण, नसांमध्ये चिकटलेले कोलेस्ट्रॉल, म्हातारपण व कॅन्सरचा धोका होईल दूर!)

ब्राऊन राईस वेटलॉससाठी रामबाण

पांढ-या तांदळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात तर ब्राऊन राईसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राऊन राईस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. ब्राऊन राईसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते. यामुळे ब्राऊन राईस खाल्ला तरी आपले वजन वाढत नाही. जीवनसत्वे आणि खनिजे ब्राऊन राईस थायमिन, निअॅसिन, जीवनसत्व बी-6, मँगेनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह 2, जस्त इत्यादी घटक ब्राऊन राईसमध्ये असतात. वजन कमी करताना कॅलरीचे सेवन लक्षात घेतले पाहिजे. ब्राऊन राईसमध्ये कमी कॅलरी कमी आढळतात. पांढर्‍या तांदळापेक्षा ब्राऊन राईसमध्ये जास्त फायबर असतात. फायबर जास्त असलेले अन्न चयापचय आणि पाचक प्रणाली सुधारण्यास मदत करते. हे वजन कमी करण्यास मदत करू शकते. म्हणून, वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस हा एक चांगला पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात ब्राऊन राईसचा समावेश करू शकतो जर भात न सोडता वजन कमी करायचे असेल तर…

  • ब्राउन राईसच्या खाण्याआधी हे वाचा
हेही वाचा :  अतिसार, पोटात दुखणे, जळजळ ही गॅसची नाही तर असू शकतात पोटाच्या colon cancer ची लक्षणे

1. ब्राऊन राईस पांढर्‍या तांदळाइतका चवदार नसतो.

2. पांढर्‍या तांदळापेक्षा ब्राऊन राईला शिजण्यास जास्त वेळ लागतो.

3. त्याला शिजवण्यासाठी जास्त पाणी लागते.

4. ब्राऊन राईस जास्त काळ टिकत नाही

5. ब्राऊन राईस ताजा खाणे अधिक फायदेशीर असते

(वाचा :- Bad Habits : विषासमान आहेत तुमच्या सकाळच्या या 5 सवयी, लवकरात लवकर बदला अन्यथा धोक्यात येईल आयुष्य..!)

डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे उपाय

डायटीशियन लवलीन कौर यांनीही राजमा चावल खाल्ल्यानंतर पोट फुगणे कसे टाळावे हे सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की एक चमचा नारळाचे तेल घालून भात शिजवल्याने मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते.

(वाचा :- करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकरने उलगडली 3 वेटलॉस रहस्य, करीनाला 2 प्रेग्नेंसीनंतरही ऋजुताने असं बनवलं स्लिम-ट्रिम..!)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …