OMG: या नवरदेवाला लग्नात मिळाला इतका हुंडा, लग्नमंडपातच गिफ्टचा ढीग… Video पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

Dowry Viral Video: हुंडा घेणं आणि देणं कायद्याने गुन्हा आहे. सरकारच्यावतीने हुंडाविरोधी (Dowry) कार्यक्रम राबवले जातात. इतकंच काय तर अनेक हिंदी – मराठी चित्रपटातही हुंडा घेणं गुन्हा असल्याचं दाखवलं जातं. भारतात 1961 साली हुंडा प्रतिबंध कायदा (Dowry Prevention Act) अस्तित्वात आला. हुंडा प्रथेला रोख लावण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते, तसंच जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती स्थापन केली जाते. हुंडा म्हणजे लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून मुलाला दिल्या जाणाऱ्या महागड्या वस्तू, रोख रक्कम किंवा सोनं. 

पण कठोर कायदा असतानाही आपल्या देशात हुंडा प्रथा बंद झालेली नाही. अनेक लग्नात आजही मुलांना हुंडा देण्याची परंपरा आहे. काही वेळा मुलीचं कुटुंब स्वेच्छेने देतं, तर काही वेळा मुलाकडून हुंडा देण्यास दबाव टाकला जातो.  यासंदर्भातल्या अनेक बातम्या आपल्या आसपासच घडत असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) याचसंदर्भातला एक व्हिडिओ वेगान व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका लग्न सुरु असून मंडपात हुंड्यात मिळालेल्या वस्तूंचा अक्षरश: ढीग लागला आहे. लग्नात नवरदेवाला इतक्या वस्तू देण्यात आल्या आहेत की सामान्य माणूस विचारही करु शकणार नाही. व्हिडिओत पाहिला मिळत असल्यानुसार नवरदेवाच्या नोटांचा हार घातलेला दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला भांडी आणि इतर वस्तूंचा ढीग लागला आहे. नवरदेवाला लग्नात किया कार मिळाली आहे. याशिवाय घरगुती वापरातल्या वस्तू मिळाल्या आहेत. 

हेही वाचा :  महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी तरीही पवार बेळगावात पोहोचले होते, लढवलेली खास शक्कल!

किचनमध्ये लागणारं प्रत्येक भांड्याचा यात समावेश आहे. याशिवाय सोफा, एसी, फ्रीज, कूलर, पंखा, बेड, डायनिंग टेबल सर्वकाही देण्यात आलं आहे. इतकंच काय काही वस्तू तर दोन-दोन, तीन-तीन वेळा मिळाल्या आहेत. नवरदेवाला सोनं आणि रोख रक्कमही मोठ्याप्रमाणात मिळाल्याचं बोललं जात आहे. लग्नात मिळालेला इतका हुंडा आणि लोकांनी दिलेलं गिफ्ट पाहून नेटकऱ्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीए. हा व्हिडिओ graduatememeswala या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

हुंड्याबाबत जागतिक अहवाल काय सांगतो?
एका जागतिक संस्थेने हुंडाविरोधात अभ्यास करुन अहवाल तयार केला आहे. भारतातील तब्बल 40 हजार लग्नांचा आढावा घेण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे यातल्या 95 टक्के लग्नात हुंडा देण्यात आला होता. यातली बहुतांश लग्न ही ग्रामीण भागातील आहेत. हुंडा न मिळाल्यास महिलांना पती आणि सासरच्यांकडून अत्याचाराला सामोरं जावं लागतं. अनेक घटनांमध्ये महिलेची हत्या किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचंही या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. 

दक्षिण आशियात हुंडा घेणं आणि देणं ही जुनी प्रथा आहे. ज्यात नवरदेवाला मुलीच्या कुटुंबियांकडून पैसे, कपडे, सोनं इत्यादी वस्तू दिल्या जातात. विशेष म्हणजे हुंडा प्रथा ही भारतातल्या प्रत्येक प्रमुख धर्मांमध्ये प्रचलित आहे. हिंदु आणि मुस्लिम धर्मियांबरोबरच सिख आण इसायी धर्मातही हुंडा प्रथा वाढल्याचं या अहवात सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा :  Viral Video : प्रँक व्हिडिओ बनवणं त्याच्या जीवावर बेतलं, 'त्या' व्यक्तीने भरमॉलमध्ये यूट्यूबरवर झाडल्या गोळा अन् मग...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …