डायबिटीसपासून PCOD पर्यंत नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरते बाजरीची भाकरी, जाणून घ्या फायदे

बाजरी एक असे धान्य आहे ज्यापासून आरोग्याला खूपच फायदे होतात. बाजरीची भाकरी केवळ थंडीतच नाही तर तुम्ही कोणत्याही हंगामात खाऊ शकता. पण थंडीत याला जास्त महत्त्व आहे. काही जण केवळ स्वादासाठीच बाजरीची भाकरी खातात. पण बाजरीच्या भाकरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि अमिनो अ‍ॅसिड आढळते. पोषक तत्वांनी भरलेली हे बाजरीचे पीठ थंडीत अधिक प्रमाणात वापरण्यात येते. मात्र डाएटमध्ये याचा अधिक फायदा होता. बाजारीच्या पिठाने तुम्ही केवळ भाकरीच नाही तर खिचडी, दलियादेखील बनवू शकता. काय आहेत याचे फायदे हे जाणून घ्या. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरनेही हे खाण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य – Freepik.com)

बाजरीच्या भाकरीचे फायदे – ऋजुता दिवेकर

​हृदय निरोगी राहण्यासाठी​

​हृदय निरोगी राहण्यासाठी​

Millet Bhakri For Healthy Heart: बाजरीच्या भाकरीमध्ये अनेक पोषक तत्व असून अत्यंत फायदेशीर मानली जाते. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते, जे शरीरासाठी आपल्या हृदयालादेखील निरोगी राहण्यासाठी मदत करते आणि अधिक चांगले ठरते.

हेही वाचा :  ऋजुता दिवेकर यांनी सांगितले शेंगदाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे

​मधुमेही व्यक्तींसाठी उपयोगी ​

​मधुमेही व्यक्तींसाठी उपयोगी ​

Bajra Bhakri For Diabetic Patients: बाजरी ही डायबिटीससाठी उपयोगी मानली जाते. बाजरीत असणारे पोषक तत्व हे मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी वरदान ठरते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी डाएटमध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करून घ्यायला हवा.

(वाचा – डायबिटीसमध्ये या पिठामुळे शोषली जाते रक्तातील साखर, Blood Sugar Level कमी होण्यासाठी करा वापर)

​PCOD साठी वरदान​

pcod-

Bajrichi Bhakri For PCOD: ज्या महिलांना पीसीओडीची समस्या आहे त्या महिलांसाठी बाजरीची भाकरी नक्कीच वरदान ठरते. मासिक पाळीच्या दिवसात अथवा नियमित याचे सेवन केल्यामुळे पोटातील दुखणे कमी होते. याशिवाय बाजरीचा फायदा पीसीओडीची समस्या कमी करण्यासाठीही होतो. यामधील विटामिन शरीराला उर्जा देऊन नसांची प्रक्रिया उत्तम ठेवण्यास मदत करते.

(वाचा – बाबा रामदेव यांनी दिला परफेक्ट Diet Plan, फॉलो कराल तर अनेक आजारांपासून राहाल दूर)

​वजन कमी करण्यासाठी ​

​वजन कमी करण्यासाठी ​

Bajra Bhakri For Weight Loss: वजन वाढताना पटकन वाढते पण वजन कमी करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही तुमच्या आहारात बाजरी भाकरीचा समावेश करून घेऊ शकता. कारण यामध्ये अधिक फायबर असल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. यामुळे अति खाणे पोटात जात नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

हेही वाचा :  तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

(वाचा – लग्नानंतर का वाढतं वजन, ही आहेत महत्त्वाची कारणं घ्या जाणून)

​पचनक्रियेसाठी उत्तम​

​पचनक्रियेसाठी उत्तम​

Bajrichi Bhakri For Digestion: अनेकांना अन्नपचनाची समस्या असते. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या आजारांनाही निमंत्रण मिळतं. पण बाजरीची भाकरी नियमित खाल्ल्याने पोटातील गॅस निघून जातो आणि पचनक्रिया चांगली होण्यास मदत मिळते.

​बाजरीची भाकरी कशी करावी​

​बाजरीची भाकरी कशी करावी​

बाजरीची भाकरी करणं सोपं नाही असं न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचं म्हणणं आहे आणि ते योग्यदेखील आहे. बाजरीची भाकरी करताना ती तुटते. त्यामुळे ती बनविण्याची एक पद्धत आहे. लाटण्याची ही भाकरी न करता, बाजरीचे पीठ मळून झाल्यावर हाताने ही भाकरी थापावी आणि मगच तयार करून भाजावी. बाजरीची भाकरी ही तुम्ही चटणी, भाजी आणि आमटी कोणत्याही पदार्थसह खाऊ शकता.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …