Delhi Crime : तरुणाला घरी नेले आणि… अटक केलेल्या दहशतावाद्यांचे कृत्य ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमिनच सरकली

Delhi Crime : दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) काही दिवसांपूर्वी दोन आरोपींना अटक (Jahangirpuri Suspects Reveal) केली आहे. दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी परिसरातून दोन संशयितांना अटक करून मोठा दहशतवादी कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. या संशयितांना दिल्ली पोलिसांनी भालस्वा डेअरी परिसरातील एका घरावर छापा टाकून दोन हॅण्ड ग्रेनेडसह शस्त्रांसोबत ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांनी एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी दिलेल्या जबाबामध्ये आरोपींनी आयएसआयएस (ISIS) पासून प्रेरित होऊन गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिल्लीत एका 21 वर्षीय तरुणाचा शिरच्छेद करत त्याच्या हत्येचा 37 सेकंदांचा व्हिडिओ बनवला होता. या दोघांनी हा व्हिडिओ त्यांचा पाकिस्तानस्थित लष्करचा दहशतवादी सोहेल (Pakistan-based handler Sohail) याला पाठवला होता.

सोहेलवर असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी आम्ही असे केले असे नौशाद (Naushad) आणि जगजीत सिंगने (Jagjit Singh) सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, ‘सोहेलचा संबंध लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी होता आणि सध्या तो पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित आहे. आम्ही तो व्हिडिओ जप्त केला आहे.’

हेही वाचा :  'मला तुम्ही फार आवडता', सूनेचं चक्क सासूवरच जडलं प्रेम, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी खासगी व्हिडीओ शूट केला अन्...

कशी केली हत्या?

14 डिसेंबर 2022 रोजी नौशाद आणि जगजीतला आदर्श नगर येथील एका पार्कात एक तरुण भेटला होता. हा तरुण अमली पदार्थाच्या आहारी गेला होता. दोघांनी त्याची फसवणूक करत ते त्या तरुणाला त्यांच्या घरी घेऊन गेले. आधी त्यांनी त्या तरुणाचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे शिर धडापासून वेगळे केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तरुणाच्या शरीराचे तुकडे केले. या सगळ्या घटनेचा त्यांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे तलावात फेकून दिले.

पोलिसांना 14 जानेवारी रोजी एका मृतदेहाचे सहा तुकडे आणि काही कपडे सापडले होते. मात्र हत्या झालेला तरुण कोण होता याबाबत अद्याप पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलिसांनी तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहेत.

आरोपींचा पाकिस्तानची संबंध काय?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, नौशादला पहिल्यांदा जवळपास 30 वर्षांपूर्वी हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तिहार तुरुंगात असताना त्याची ओळख लश्कर ए तोयबाच्या मोहम्मद आरिफसोबत झाली होती ज्याला 2000 साली लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. दुसकीकडे नौशादची 2011 साली सोहेलसोबत ओळख झाली. 2013 साली सुटका झाल्यानंतर सोहेल पाकिस्तानात निघून गेला. 2018 साली बाहेर आल्यानंतर नौशादला एका प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली. यावेळी त्याची ओळख जगजीत सिंगसोबत झाली.

हेही वाचा :  Video: भारत-चीन सीमेवर उणे तापमानात बर्फावर ITBP जवानांची रंगवला कबड्डीचा सामना | Video: ITBP jawans play Kabaddi match on snow on minus temperature on Indo-China border

एप्रिल 2022 मध्ये बाहेर आल्यानंतर नौशादने तुरुंगातून बाहेर येताच पाकिस्तानातील सोहेलसोबत संपर्क साधला. काही दिवसांनी जगजीतसुद्धा तुरुंगाबाहेर आला. त्यानंतर नौशादने त्याची सोहेलसोबत ओळख करुन दिली. यानंतर काही पैशांचे व्यवहार झाल्यानंतर सोहेलने दोघांनी काही कामे सोपवली होती



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …