Blood Sugar कंट्रोल करतील हे गावटी रोपं, अगदी फुल, पानं आणि खोड सगळंच गुणकारी, खर्च अवघा २५ रुपये

मधुमेह नियंत्रण करणारी वनस्पती

मधुमेह नियंत्रण करणारी वनस्पती

जर तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वस्त आणि प्रभावी उपचार शोधत असाल तर आजपासून तुमच्या बागेत दोन रोपे लावा. या दोन वनस्पती म्हणजे पनीरचे फूल (Withania coagulans) आणि इन्सुलिन वनस्पती (Insulin Plant). या दोन्ही वनस्पती तुमच्या बागेचे सौंदर्य वाढवू शकतात तसेच तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकतात.

(वाचा – थोडी थोडी लघवीला होणे, धार कमी होणे? ब्लॅडरला आतून पोखरून टाकतायत ८ जीवघेणे आजार)​

Insulin Plant म्हणजे काय?

insulin-plant-

इन्सुलिन वनस्पतीला कॉस्टस इग्नियस (Costus igneus) म्हणतात. भारतात याला इन्सुलिन प्लांट म्हणून ओळखले जाते. ही वनस्पती कॉस्टेसी कुटुंबातील आहे. असे मानले जाते की त्याच्या पानांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्याची पाने हलकी रुंद व हिरव्या रंगाची असून त्यावर लहान लाल फुले येतात. हे रोप तुम्हाला कोणत्याही रोपवाटिकेत 25 रुपयांपर्यंत सहज मिळेल.

​(वाचा – आतड्यांना पिळवटून टाकणाऱ्या मुळव्याधावर आयुर्वेदिक उपाय, ऑपरेशनशिवाय व्हाल बरे)​

हेही वाचा :  Diabetes and Turmeric : सकाळी रिकाम्या पोटी हळदीत 'या' 2 गोष्टी मिक्स करून मिश्रण चाटा, पोट साफ न होणं, अपचन, डायबिटीज, वेदनांपासून मिळेल मुक्ती!

इन्सुलिन वनस्पती रक्तातील साखर कमी करते

इन्सुलिन वनस्पती रक्तातील साखर कमी करते

एनसीबीआयमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असे मानले जाते की, इन्युलिन हिरव्या पानांचे सेवन रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही उंदरांना त्याच्या कोरड्या पानांपासून पाण्यात विरघळलेली पावडर दिली. शास्त्रज्ञांना 10 दिवसांनंतर आढळले की त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

इन्सुलिन वनस्पती कसे वापरावे

इन्सुलिन वनस्पती कसे वापरावे

शास्त्रज्ञांनी इन्सुलिनची पाने सुकवून पावडर बनवून वापरली. त्यांच्या अभ्यासात त्यांनी ही पावडर पाण्यात विरघळवून उंदरांना दिली. याचा अर्थ त्याच्या पानांची पावडर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ते घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(वाचा – वजन कमी करण्यासाठी वापरली जाते बुलेट कॉफी? या कॉफीचे फायदे आणि शरीरावर होणारा परिणाम)​

पनीरचे फूल म्हणजे काय?

पनीरचे फूल म्हणजे काय?

पनीरचे फूल ही एक भारतीय औषधी वनस्पती आहे. ज्याचे असंख्य आरोग्य फायदे आहेत. ही वनस्पती Solanaceae कुटुंबातील आहे. ही वनस्पती अश्वगंधा म्हणून ओळखली जाते. ही एक छोटी वनस्पती आहे ज्यावर रास्पबेरीसारखी छोटी फुले येतात.

पनीरच्या फुलामुळे साखर कंट्रोलमध्ये

पनीरच्या फुलामुळे साखर कंट्रोलमध्ये

नेचरमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळून आले आहे की, या वनस्पतीच्या फुलातून काढलेल्या रसाच्या वापरामुळे मधुमेही उंदरांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. ज्या डायबिटिस उंदरांना हा रस पाच दिवस देण्यात आला त्यांच्या रक्तातील साखरेमध्ये सुरुवातीच्या पातळीच्या तुलनेत ६० टक्के घट दिसून आली.

हेही वाचा :  आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं खास चूर्ण, १५ दिवसांत कमी होणार ब्लड शुगर

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …