Diabetes and Turmeric : सकाळी रिकाम्या पोटी हळदीत ‘या’ 2 गोष्टी मिक्स करून मिश्रण चाटा, पोट साफ न होणं, अपचन, डायबिटीज, वेदनांपासून मिळेल मुक्ती!

मधुमेह (diabetes) ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज अजून अस्तित्वातच नाही. हेल्दी डाएट आणि जीवनशैलीनेच यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित पद्धतीने वाढते, ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी एक हळद आहे. हळदीच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर अन्नाला रंग आणि चव देण्यासोबतच ती अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात असलेल्या शंभरहून अधिक रासायनिक संयुगांमुळे त्याला चमत्कारिक मसाला म्हटले जाते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे सक्रिय कंपाऊंड असते, जे अनेक रोगांचा धोका टाळू शकते. हळद मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असा दावा अनेक अभ्यासांत केला आहे. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर हळदीचे अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही त्यात आवळा आणि आले घालू शकता. (फोटो साभार: istock by getty images)

हळदीसोबत आवळा आणि आलेच का?

हळद, आवळा आणि आले या सर्वांचे विविध व वेगवेगळे फायदे आहेत. या तिन्ही गोष्टी एकत्र मिसळल्या की आरोग्यदायी टॉनिक तयार होते. आयुर्वेदात या तीन गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत.

हेही वाचा :  पेरूच्या पानांमध्ये खच्चून भरलंय इन्सुलिन, या पद्धतीने वापर केल्यास एका झटक्यात कमी होईल ब्लड शुगर

(वाचा :- Bone Cancer – सावधान, हाडांचा कॅन्सर होण्याआधी शरीर देतं ‘हे’ 5 संकेत, दुर्लक्ष करू नका अन्यथा गमवावा लागेल जीव..!)

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी उपयुक्त

हळदी सोबत आलं आणि आवळ्याचा रस मिक्स करून घेतल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. या तिन्ही गोष्टींमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्ससह विविध पोषक घटक आढळतात, जे रक्तातील साखर वाढण्यापासून रोखतात. इतकेच नाही तर हे मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

(वाचा :- लठ्ठपणामुळे व्हाल डायबिटीजसारख्या 5 भयंकर आजारांचे शिकार, पोटावरची चरबी जाळण्यासाठी प्या ‘हे’ 4 प्रकारचे घरगुती चहा!)

पोटाच्या सर्व समस्यांवर रामबाण

आले आणि हळदीचे गुणधर्म पोटदुखी, अपचन, सूज आणि मळमळ यासह पोटाच्या सर्व समस्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत. जर तुम्हाला सुद्धा अशा समस्या सतत भेडसावत असतील तर तुम्ही या मिश्रणाचे दररोज रिकाम्या पोटी सेवन केले पाहिजे.

(वाचा :- 120 किलोच्या मुलाची वेटलॉस स्टोरी वाचून व्हाल हैराण, चपाती आणि भात न सोडताच घटवलं तब्बल 37 किलो वजन!)

सर्दी-खोकल्यापासून मिळतो आराम

हे मिश्रण रोज सकाळी घेतल्यास सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो. आल्यामध्ये ते सर्व गुणधर्म आढळतात जे सर्दी आणि खोकल्याशी लढण्यास मदत करतात. आवळा हे जीवनसत्त्वांचे भांडार आहे, जे शरीराला विविध गंभीर रोगांशी लढण्याची ताकद देते.

हेही वाचा :  किडन्या मजबूत व स्वच्छ ठेवण्यासाठी ताबडतोब करा हे साधेसोपे 5 उपाय

(वाचा :- Foods for blood vessels : शरीरातील सर्व कमजोर नसा एका आठवड्यात होतील मजबूत, आजपासूनच सुरू करा ‘ही’ 5 कामं..!)

शारीरिक वेदना होतात दूर

हे मिश्रण अँटीइनफ्लेमेट्री गुणधर्मांचा खजिना असल्याने शरीराच्या वेदनांवर उपचार करण्यासाठी ते तुम्हाला खूप मदत करू शकते. तथापि आपण या मिश्रणाचे मर्यादित प्रमाणातच सेवन करायला हवे.

(वाचा :- Brain Hemorrhage : नव-याने मारल्यामुळे या मॉडेलला झाला ब्रेन हॅमरेज, झाली अशी विचित्र हालत, जाणून घ्या या आजाराची लक्षणे, कारणे व उपाय!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

RBIची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर कारवाई; ग्राहकांना पैसेही काढता येणार नाही

Reserve Bank Of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बॅकेवर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ठाणे …

‘एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत…’ बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्राहर …