आंबट ढेकर, पोटात आग, छातीत जळजळ म्हणजे शरीरात बनलं भयंकर अ‍ॅसिड,मुळापासून अ‍ॅसिडिटीचा नाश करतात हे 3 सोपे उपाय

गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (Gastroesophageal Reflux Disease) ज्याला जीईआरडी (GERD) किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्स (Acid Reflux) देखील म्हणतात, हा एक गंभीर पचनासंबंधित आजार आहे. हा रोग तेव्हा होतो जेव्हा पोटातील अ‍ॅसिड सतत अन्ननलिकेत (Esophagus) परत जाते. अन्ननलिका ही एक नलिका आहे जी आपल्या तोंडाला पोटाशी जोडते. सामान्य भाषेत या समस्येला पोटात पित्त किंवा अ‍ॅसिड होणे असेही म्हणतात. ही एक सामान्य समस्या आहे आणि बऱ्याच लोकांना याचा सामना करावा लागतो. जेव्हा पोटातील अ‍ॅसिड अन्ननलिकेमध्ये परत जाते, तेव्हा तुम्हाला अपचन, छातीत जळजळ, मळमळ, उलट्या आणि तोंडातून दुर्गंधी येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

खरे तर अन्न पचवण्यासाठी अ‍ॅसिडची गरज असते पण जेव्हा त्याचे प्रमाण वाढते तेव्हा ती अन्नासोबत आतड्यात जाण्याऐवजी वरच्या दिशेने अर्थात तोंडाच्या दिशेने जाऊ लागते. मग या अ‍ॅसिड रिफ्लक्सवर उपचार काय आहे? तर मंडळी, या समस्येकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही त्यावर वेळीच उपाय केला पाहिजे, अन्यथा अजून अनेक विकार होऊ शकतात. आज या लेखातून आपण अ‍ॅसिड रिफ्लक्सची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून आराम कसा मिळू शकतो हे जाणून घेऊया. आयुर्वेदाच्या डॉ. दीक्षा यांनी अ‍ॅसिड रिफ्लक्सवरही काही उपाय सांगितले आहेत. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  पोटात गॅस-छातीत जळजळ, मोकळेपणाने ढेकर देणंही झालंय कठीण? या ५ सवयींमुळे आतडे जाळून तयार होते भयंकर ऍसिडिटी

हार्टबर्न किंवा पोटात-छातीत जळजळ

हार्टबर्न किंवा पोटात-छातीत जळजळ

छातीत जळजळ हे अ‍ॅसिड रिफ्लक्सचे सर्वात सामान्य लक्षण आहे. या समस्येमध्ये तुमच्या छातीच्या बरोबर हाडामागे जळजळ होते. ही जळजळ पाठीच्या खालच्या भागातून घशात जाऊ शकते. जेव्हा पोटातील अ‍ॅसिड अन्ननलिकेच्या अस्तरात परत येते तेव्हा असे होते. ही जळजळ काही मिनिटांपासून अनेक तासांपर्यंत त्रास देऊ शकते. या समस्येवर अनेक घरगुती उपाय सुद्धा उपलब्ध आहेत पण जर त्याने काही फरक पाडत नसेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधणे उत्तम!

(वाचा :- Cholesterol Remedy: फक्त 2 रूपयांत अक्षरश: रक्तातून गाळून निघेल पूर्ण कोलेस्ट्रॉल,हार्वर्डने शोधला स्वस्त उपाय)​

Regurgitation ची समस्या

regurgitation-

जर तुम्हाला अ‍ॅसिड रिफ्लक्स असेल तर तुम्हालाही ही समस्या असू शकते. ही समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा न पचलेले अन्न पोटातील अ‍ॅसिडसोबत पोटातून अन्ननलिकेकडे परत जाते. यामुळे तुम्हाला ढेकर येऊ शकतो आणि तोंडात आंबट पाणी आल्यासारखे वाटू शकते. जास्त खाणे, जेवणानंतर लगेच व्यायाम करणे किंवा खाल्ल्यानंतर वाकणे यामुळे ही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या रोखायची असेल जेवणानंतर लगेच अशा कोणत्याही क्रिया करू नका.

(वाचा :- ब्लड सर्क्युलेशन 100% वेगाने धावून क्रॅम्प्स, वेदना, कंबर-मानेत भरलेली चमक 2 मिनिटांत छुमंतर,ऋजुताचा कमाल उपाय)​

डिसफॅगिया किंवा गिळताना त्रास होणे

डिसफॅगिया किंवा गिळताना त्रास होणे

डिसफॅगिया म्हणजे गिळण्यास त्रास होणे. आपले अन्न आपल्या घशात किंवा छातीत अडकल्यासारखे वाटणे. हे देखील अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे होऊ शकते. ही समस्या अनेकांना ओळखता येत नाही किंवा अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे करणे धोकादायक ठरू शकते. वेळीच या समस्येवर उपाय करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :  Women Minister On Playboy Cover: महिला मंत्री झळकली Playboy मासिकाच्या मुखपृष्ठावर! बोल्ड फोटोमुळे एकच खळबळ

(वाचा :- Siddharth ची नवरी होण्याआधीच Kiara ची चर्चा, शरीरावर वाढलेली चरबी अशी केली 0%, फिगर व फिटनेस बघून व्हाल अचंबित)​

घसा खवखवणे व आवाज भारी होणे

घसा खवखवणे व आवाज भारी होणे

अ‍ॅसिड रिफ्लक्स हे पोटातील अ‍ॅसिड अन्ननलिकेत परत गेल्यामुळे होते. यामुळे घसा सर्वात जास्त प्रभावित होतो, ज्यामुळे घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि घशात घरघर होऊ शकते. यामुळे तुमचा आवाज कर्कश होऊ शकतो.

(वाचा :- Hanuman Phal Benefits: नावाइतकंच शक्तीशाली आहे हे छोटंसं फळ, पोट साफ ठेवण्यासोबतच कॅन्सर व डायबिटीजचा करतं नाश)​

जुना खोकला

जुना खोकला

अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे तुम्हाला खोकला येऊ शकतो आणि तो दीर्घकाळ टिकू शकतो. खोकला हे खरे तर अन्ननलिकेमध्ये पोटातील अ‍ॅसिड वाढण्याची क्रिया म्हणून पाहिले जाते. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेट द्या किंवा काही घरगुती उपाय करून पहा.

(वाचा :- परवेझ मुशर्रफनी 7 वर्ष किडनी, लिव्हर, हार्टच्या नसा ब्लॉक करणा-या आजाराशी दिला लढा, या 10 लक्षणांनी केलं तांडव)​

पोटात अ‍ॅसिड होण्यावर आयुर्वेदिक उपाय

पोटात अ‍ॅसिड होण्यावर आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी पोटात अ‍ॅसिडमुळे होणाऱ्या त्रासावर उपाय सांगितला आहे. पहिला उपाय म्हणजे 1 ग्लास पाणी घेऊन त्यात 1 टेबलस्पून कोथिंबीर, 5 पुदिन्याची पाने आणि 15 कढीपत्ता पाने घालून 5 मिनिटे उकळवा, नंतर ते पाणी गाळा आणि सकाळी प्या. दुसरा उपाय म्हणजे जेवल्यानंतर नेहमी 1 चमचे बडीशेप खाणे. तिसरा उपाय म्हणजे 1 कप पाणी घ्या आणि ते 3 मिनिटे उकळवा. नंतर त्यात गुलाबाच्या काही सुकलेल्या पाकळ्या टाका आणि 5 मिनिटे शिजवा. ते पाणी गाळून रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी प्या.
(वाचा :- लघवीत हा रंग दिसणं म्हणजे किडनीच्या कॅन्सरची सुरूवात? डॉ. सांगितली किडनीच्या कॅन्सरची 10 ठोस लक्षणं, व्हा सावध)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  जगातील पहिली Porn युनिव्हरसिटी, जिथे दिलं जातं Adult चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचं प्रशिक्षण

पोटातील अ‍ॅसिड कमी करण्यासाठी उपाय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bhendwal Ghatmandni : भेंडवळची भविष्यवाणी झाली! यंदा भरपूर पाऊस, शेतकऱ्यांसाठीही Good News

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : वऱ्हाडातील सुमारे 350 वर्षांपासूनची परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची …

Weather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

15 मेपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. …