लघवीत जळजळ झाल्यास समजून जा तुम्ही केली आहे ही मोठी चूक, किडनी, पोट, आतड्यांत जमा झालाय विषारी पदार्थांचा साठा

शरीराला शक्ती आणि ऊर्जा देण्यासाठी अन्नाचे सेवन खूप महत्वाचे आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की अन्नामध्ये अॅसिड आणि अल्कलाइन गुणधर्म देखील असतात. जर तुम्ही अॅसिडयुक्त अन्नपदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरात आम्ल अर्थात अॅसिड तयार होऊ लागते. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न कधी ना कधी पडला असेलच की शरीरात अॅसिड नेमके कसे तयार होते? तर मंडळी, अन्नाप्रमाणेच आपल्या सर्व अवयवांमध्येही अॅसिड किंवा अल्कलाइन लेव्हल असते.

जेव्हा अॅसिडयुक्त पदार्थ शरीरात प्रवेश करतात तेव्हा ते पोट, आतडे आणि मूत्रपिंडांची PH पातळी म्हणजेच अॅसिड व अल्काईन लेव्हल खराब करतात. त्यामुळे अॅसिडिटी, लघवीमध्ये जळजळ, छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. आज पण या लेखातून अशाच काही फुड्स बद्दल जाणून घेणार आहोत जे शरीरातील अॅसिडची पातळी वाढवण्यास जबाबदार असतात आणि ज्यांना अॅसिडयुक्त फुड्स म्हणून ओळखले जाते. (फोटो सौजन्य :- iStock)

कोणत्या पदार्थांमध्ये असते अ‍ॅसिड?

कोणत्या पदार्थांमध्ये असते अ‍ॅसिड?

NCBI च्या मते, काही खाद्यपदार्थ ज्यांची pH पातळी 4.6 किंवा त्यापेक्षा कमी आहे ते अधिक अॅसिडयुक्त मानले जातात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन थांबवावे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

  1. चीजसोबतच काही दुग्धजन्य पदार्थ
  2. मासे आणि इतर सीफूड
  3. हाय सोडियम असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ
  4. नॉन व्हेज फूड्स
  5. स्टार्च फूड जसे की ब्राऊन राइस, ओट्स
  6. सोडासारखे कार्बोनेटेड ड्रिंक
  7. हाय प्रोटीन फूड्स आणि सप्लीमेंट्स
हेही वाचा :  अभिनेत्री Juhi Parmar ने घरात तयार केले Vitamin C Serum

यांचा अशा पदार्थांमध्ये समावेश होतो. त्यामुळे आहारात ह्या पदार्थांचा किमान वापर करा.

(वाचा :- शास्त्रज्ञांचा अजब दावा – अंड्याचा हा एक भाग आहे अत्यंत विषारी, या 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत Eggs)

लघवीत होते जळजळ

लघवीत होते जळजळ

NCBI वर प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, अॅसिड बनवण्यास जबाबदार असणारे अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील अॅसिड वाढते आणि लघवीत जळजळ होण्यास सुरुवात होते. याव्यतिरिक्त, युरिक अॅसिडची पातळी देखील धोकादायकरित्या वाढायला सुरुवात होते आणि किडनी स्टोन अर्थात मुतखडे तयार होऊ शकतात. जर वेळीच यावर नियंत्रण मिळवले नाही तर परिस्थिती हाताबाहेर देखील जाऊ शकते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुम्ही सावध होणे गरजेचे आहे.

(वाचा :- Fact Check: हे ड्रिंक प्यायल्याने एका झटक्यात बाहेर पडतो मुतखडा व पित्ताशयाचा खडा, काय आहे या दाव्यामागील सत्य)

हाडे गळू लागतात

हाडे गळू लागतात

अॅसिड तयार करणारे अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तातील अॅसिड देखील वाढते. अशावेळी आपले शरीर हाडांमधून कॅल्शियम शोषून घेऊन रक्ताची पीएच पातळी नियंत्रित करू लागते. पण दुसरीकडे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊन तुटण्याचा धोका असतो. अनेकांना ही गोष्टच माहित नसल्याने अशी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पनाच नसते.

(वाचा :- Metabolism कमी झालं तर बाहेरच नाही तर आतील भागांवरही जमू लागते चरबी, हे 5 पदार्थ झटक्यात वाढवतात मेटाबॉलिक रेट)

कमी अ‍ॅसिडयुक्त पदार्थ नेमके कोणते?

कमी अ‍ॅसिडयुक्त पदार्थ नेमके कोणते?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मग कमी अॅसिडयुक्त पदार्थ नेमके कोणते आहेत? तर सोयाबीनसारखी सोया उत्पादने, दही आणि दूध, बटाटे, ताज्या भाज्या, फळे, शेंगा आणि कडधान्ये, ऑलिव्ह ऑईल, अव्हाकॅडो, नट्स आणि बिया इत्यादी पदार्थांचा समावेश हा कमी अॅसिडयुक्त पदार्थांमध्ये होतो. त्यामुळे तुम्ही अधिकाधिक या पदार्थांचा आहात समावेश करून शरीरातील वाढती अॅसिडची पातळी रोखू शकता.

हेही वाचा :  Pune Rain News: पुण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी!

(वाचा :- सावधान, या लोकानी चुकूनही पिऊ नये कोमट पाणी, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तीने कसं पाणी प्यावं?)

युरीक अ‍ॅसिडची समस्या

युरीक अ‍ॅसिडची समस्या

शरीरात युरीक अॅसिडची लेव्हल वाढणे हा एक धोकादायक संकेत आहेत. याचा अर्थ असा की अनेक आरोग्य समस्या लवकरच तुम्हाला त्रास देणार आहेत. शरीरातील युरीक अॅसिडची लेव्हल कंट्रोल करणे खूप जास्त गरजेचे आहे. युरीक अॅसिड वाढल्यामुळे होणाऱ्या समस्यांपैकी एक समस्या आहे सांधेदुखी! जर यावर वेळीच तुम्हाला उपाय करता आले नाही वा नियंत्रण मिळवता आले नाही तर ही समस्या हळूहळू वाढत जाते. तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की युरीक अॅसिड वाढल्याने नेमके होते काय? युरीक अॅसिडची लेव्हल जर वाढली तर केवळ सांधेदुखीच नाही तर हाडे आणि अन्य अवयवांना सुद्धा त्रास निर्माण होतो. यात ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्येचा सुद्धा समावेश आहे. युरीक अॅसिड जर वाढले तर किडनी स्टोन आणि लठ्ठपणा यांसारखे आजार सुद्धा सतावू शकतात, युरीक अॅसिडचे प्रमाण वाढण्याच्या स्थितीला हाइपरयूरिसीमिया असेही म्हणतात.

(वाचा :- Oil For Kidney : खराब झालेल्या दोन्ही किडन्या होतील मजबूत व स्वच्छ, रोज जेवणात फक्त इतके चमचे वापरा हा पदार्थ)

हेही वाचा :  बापाने लेकीला गिफ्ट केली खराब पाण्याने भरलेली बॉटल; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

हळदीचा वापर करा

हळदीचा वापर करा

हळद ही शरीरातील युरीक एसिडच्या लेव्हलला कमी करू शकते. हळद युरीक एसिड कशी कंट्रोल करते?हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा सर्वात जास्त सक्रीय घटक आढळतो. याला एक पावरफुल एंटीइंफ्लेमेटरी म्हणून ओळखले जाते. आर्थराइटिस रिसर्च एंड थेरेपीट्रस्टेड सोर्स मध्ये 2019 साली केल्या गेलेल्या पशु संशोधनानुसार, करक्यूमिन हे नुक्लेअर फॅक्टर-कप्पा बी (एनएफ-कप्पा बी) नावाच्या प्रोटीनला दाबू शकते. एनएफ-कप्पा बी अनेक इंफ्लेमेटरी डिजीजला कारणीभूत असते आणि म्हणूनच ते रोखण्यासाठी हळद कामाला येते. जाणकार सुद्धा या गोष्टीची पुष्टी करतात.

(वाचा :- जेवणासोबत सॅलेड खात असाल तर थांबा नाहीतर नुकसान अटळ, न्युट्रिशनिस्टने सांगितली सॅलेड खायची योग्य वेळ आणि पद्धत)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

अ‍ॅसिडिक पदार्थांमुळे होतो डॅंड्रफ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न …