Valentine Week 2023: ७ फेब्रुवारीपासून प्रेमाचा आठवडा सुरू, व्हॅलेंटाईन विक असतो तरी कसा

प्रेमाचा महिना चालू झालाय. फेब्रुवारी महिन्यातील ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हे दिवस Valentine Week म्हणून साजरे केले जातात. पण काही जणांना नक्की कोणत्या दिवशी कोणता दिवस साजरा करायचा याची कल्पना नसते. नात्यात प्रेम नुसतं असून चालत नाही तर ते व्यक्त करण्याचीही गरज भासते. काही कपल्स यासाठी खूप काही प्लॅन्स आखतात, तर ज्यांच्या प्रेमाची सुरूवात असते अथवा ज्यांना आपलं प्रेम व्यक्त करायचं असतं त्यांच्यासाठी थोडं मनात कालवाकालव होत असते. वॅलेंटाईनचे हे टाईम-टेबल नक्की कसे असते घ्या जाणून. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​पहिला दिवस – रोझ डे – ७ फेब्रुवारी​

​पहिला दिवस - रोझ डे - ७ फेब्रुवारी​

7 February – Rose Day: फेब्रुवारी महिन्याची ७ तारीख म्हणजे वॅलेंटाईन विकची सुरूवात. हा दिवस सुरू होतो तो गुलाबाच्या सुखद सुगंधाने. Rose Day असं या पहिल्या दिवसाला नाव देण्यात आलं आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबासारखे दुसरे फूल नाही असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पहिल्या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर जीव लावतोय अशा व्यक्तीला गुलाब देऊन आठवड्याची सुरूवात केली जाते. मात्र केवळ लाल गुलाब अर्थात हे प्रेमाचे प्रतीक देऊन या आठवड्याची तुम्ही सुरूवात करा.

हेही वाचा :  Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

​दुसरा दिवस – प्रपोज डे – ८ फेब्रुवारी​

​दुसरा दिवस - प्रपोज डे - ८ फेब्रुवारी​

8 February – Propose Day: दुसरा दिवस म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी Propose Day साजरा केला जातो. तुम्हाला जे मनापासून आवडतात त्या व्यक्तीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करून आयुष्यभराची साथ देण्यासाठी मागणी घालण्याचा हा दिवस आहे. तुम्ही या क्षणाची जर आतुरतेने वाट पाहिली असेल तर नक्की या दिवसाचा आधार घेत तुम्ही प्रपोज करा आणि जर आधीच प्रपोज केले असेल तर त्याची पुनरावृत्ती करत डेटवर न्या.

(वाचा – Long Distance Relationship मध्ये कसा कराल व्हॅलेंटाईन डे साजरा, या गोष्टी लक्षात ठेवाल तर भांडणं होणार नाहीत)

​तिसरा दिवस – चॉकलेट डे – ९ फेब्रुवारी​

​तिसरा दिवस - चॉकलेट डे - ९ फेब्रुवारी​

9 February – Chocolate Day: गेल्या २०० वर्षांपासून चॉकलेट हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनला आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेटशिवाय दुसरा योग्य पदार्थ नक्की काय असू शकतो? Chocolate Day च्या दिवशी प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तींनी एकमेकांना चॉकलेट्स देऊन हा दिवस साजरा करावा. कारण चॉकलेटच्या गोडव्याप्रमाणे हे नातं अधिक गोड व्हावं आणि मुरावं अशीच यामागील भावना असते.

(वाचा – व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय पण तुमचा जोडीदार सतत ex बद्दल बोलत राहतो? चिडचिड करु नका अशा प्रकारे करा हँडल)

हेही वाचा :  Teddy Day 2023: मुलींना आवडतात ‘या’ रंगांचे टेडी, नातं टिकवण्यासाठी रंगाचे महत्त्व जाणून घ्या

​चौथा दिवस – टेडी डे – १० फेब्रुवारी​

​चौथा दिवस - टेडी डे - १० फेब्रुवारी​

10 February – Teddy Day: टेडी बेअरचे हृदय हे अत्यंत नाजूक आणि भावनिक मानले जाते. त्यामुळे मनाची भावनिकता समजून देण्यासाठी Teddy Day चौथ्या दिवशी साजरा करण्यात येतो. टेडी बेअरचे सॉफ्ट टॉईज एकमेकांना देऊन हे मन कायम जपण्याची भावना आणि वचन एकमेकांना देण्याचा हा दिवस आहे. वास्तविक मुलींना असे सॉफ्ट टॉईज अधिक आवडतात आणि म्हणूनच त्यांना खुष करण्यासाठी हे देण्यात येते.

(वाचा – धर्म आणि वयाची बंधनं झुगारून केले होते मराठमोळ्या उर्मिलाने लग्न, करतेय सुखाचा संसार)

​पाचवा दिवस – प्रॉमिस डे – ११ फेब्रुवारी​

​पाचवा दिवस - प्रॉमिस डे - ११ फेब्रुवारी​

11 February – Promise Day: प्रेम करणे जितके सोपे आहे तितकेच ते निभावणे कठीण. त्यामुळे प्रपोज केल्यानंतर आयुष्यभर हे नातं जपण्यासाठी वचन देण्याचा दिवस म्हणजे Promise Day. आयुष्यभराची साथ निभावण्याचे वचन एकमेकांना देत सुखी संसाराची स्वप्नं या दिवशी सजवली जातात. अनेकांची स्वप्नं इथपासूनच सुरू होतात.

​सहावा दिवस – हग डे – १२ फेब्रुवारी​

​सहावा दिवस - हग डे - १२ फेब्रुवारी​

12 February – Hug Day: Hug Day अर्थात एकमेकांना मिठीत घेत आपण एकमेकांना स्पर्श करून किती प्रेम करतो याची कल्पना द्यावी. स्पर्शात एक वेगळीच भावना असते. या स्पर्शातूनच कळतं की समोरची व्यक्ती आपल्यावर किती प्रेम करते हे कळतं. समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी असलेल्या भावना अधिक चांगल्या कळतात.

​सातवा दिवस – किस डे – १३ फेब्रुवारी​

​सातवा दिवस - किस डे - १३ फेब्रुवारी​

13 February – Kiss Day: प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची तर गरज असतेच पण एक प्रेमाचे चुंबन अर्थात Kiss हे सर्वकाही सांगून जाते. Kiss Day च्या दिवशी आपल्या जोडीदाराला चुंबन देत आपले प्रेम व्यक्त करावे. कधी कधी शब्दात ती जादू नसते जी आपल्या आवडत्या व्यक्तीला जवळ घेऊन Kiss करण्यात असते.

हेही वाचा :  कोणी गोंदवलं हातावर नाव तर कोणी प्रेमासाठी धर्मच बदलला, बॉलिवूड स्टार्सनी जोडीदारांना भन्नाट स्टाईलमध्ये केलं propose

​आठवा दिवस – व्हॅलेंटाईन डे – १४ फेब्रुवारी​

​आठवा दिवस - व्हॅलेंटाईन डे - १४ फेब्रुवारी​

प्रेम तर आपण रोजच करतो, काळजीही रोज घेतो. पण हे सर्व व्यक्त करण्याचा आणि आपल्या जोडीदारासह एक स्पेशल दिवस व्यतीत करण्याचा हा Valentine’s Day. प्रेम वर्षभर साजरे करावे हे जरी खरे असले तरीही हा स्पेशल दिवसही साजरा करायलाच हवा. धावपळीच्या आयुष्यात कधी कधी वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपले प्रेम व्यक्त करणे कधीच चुकीचे ठरत नाही.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …