Parenting Tips: मुलांच्या वडिलांकडून होतात बरेचदा या चुका, बाँड जपण्यासाठी वेळीच सुधारा

Parenting Mistakes To Avoid: तुम्ही जर लहानपण आठवत असाल तर प्रत्येकाला आईपेक्षा वडिलांचाच धाक अधिक असल्याचं जाणवेल. सर्वात जास्त प्रेम हे आईचं जाणवतं असंच कोणाचंही उत्तर येईल. याचा अर्थ बाबांचं प्रेम नसतं असा होत नाही. आईपेक्षा मुलं वडिलांना अधिक घाबरतात. आपल्याकडे आजही मुलगा आणि मुलींचं पालनपोषण हे वेगवेगळ्या पद्धतीने होतं. मुलींशी हळूवारपणे वागलं जातं काही बाबतीत तर मुलांना कठोरपणे समजावलं जातं. मात्र वडिलांची वागणूक ही मुलांच्या विकासात महत्त्वाची असते. त्यामुळे काही चुका टाळण्याची गरज आहे. या चुका नक्की कोणत्या घ्या जाणून. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​मुलांशी अति कठोर वागणे​

​मुलांशी अति कठोर वागणे​

तुम्ही वडील असाल तर आपल्या मुलांशी आपण नक्की कसे वागतोय याचा एकदा विचार करावा. तुम्ही मुलांना अधिक कठोरपणाने वागवत असाल, त्यांच्यावर रागाने ओरडून बोलत असाल तर मूल तुमच्याजवळ जास्त राहणार नाही आणि मुलांना तुमच्याविषयी प्रेमही वाटणार नाही. जास्त कठोर वागल्यामुळे तुमच्याजवळ आपल्या मनातील गोष्टी बोलण्यास तुमचेच मूल धजावणार नाही. त्यामुळे चूक झाल्यावर चुकीची जाणीव करून देत सौम्य शब्दात समजवा.

हेही वाचा :  International Tourism : केवळ 40-50 हजारात इंटरनॅशनल टूर ? पर्याय जाणून तुम्ही आजच बॅग पॅक करायला घ्याल

​मुलांना वेळ देत नाहीत वडील​

​मुलांना वेळ देत नाहीत वडील​

साहजिक आहे की घरातील पुरूषांना जबाबदारीचा अधिक भार असतो. त्यामुळे मुलांना वेळ देणं शक्य होत नाही. पण याचा वाईट परिणाम हा मुलांवर होत असतो. त्यामुळे तुम्ही रोज वेळ देऊ शकत नसलात तरीही किमान आठवड्यातून एकदा आपल्या मुलांना वेळ द्या आणि मुलांच्या आयुष्यात नक्की काय चालू आहे अथवा त्यांना काय हवंय याबाबत बोला. यामुळे बाँड अधिक चांगला होण्यास मदत मिळते.

(वाचा – वयाच्या ४० व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेताय, तर या गोष्टींची होईल मदत)

​मुलांना सांभाळत नाहीत वडील​

​मुलांना सांभाळत नाहीत वडील​

मुलांना सांभाळण्याचं काम अजूनही आईच करताना दिसून येते. त्यांना काय हवं, काय नको हे सर्व आईलाच माहीत असतं. त्यामुळेच मुलं अधिक आईच्या जवळ असतात. मात्र वडील असल्या कारणाने तुम्ही तुमच्या जोडीदाराला साथ देत मुलांना सांभाळण्याचं काम केल्यास, त्यांना तुमच्याविषयीदेखील अधिक प्रेम वाटण्यास मदत मिळते. तुम्ही योग्य पद्धतीने त्यांना जाणून घेऊ शकता.

(वाचा – मुलांचा स्क्रिन टाईम वाढतोय, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे)

​मुलांच्या अभ्यासात कठोरता आणणे​

​मुलांच्या अभ्यासात कठोरता आणणे​

तुम्हाला आठवतंय का तुम्ही कधी आईऐवजी बाबांना शाळेत प्रगतीपुस्तक आणायला घेऊन गेला आहात? नक्कीच नाही. कारण अनेक कुटुंबात वडील हे अभ्यासाच्या बाबतीत अधिक कडकपणाने वागताना दिसतात. पण त्याचा ताण मुलांच्या डोक्यावर येतो आणि वडिलांशी बाँड निर्माण होत नाही. तसंच याचा दबाव येऊन मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

हेही वाचा :  50 राज्यात 100 गर्लफ्रेंड तरी याला अजून सापडलं नाही खरं प्रेम

(वाचा – आईप्रमाणेच वडिलांनीही करावी बाळाची ‘स्किन टू स्किन केअर’, जाणून घ्या कांगारू केअरचे महत्त्व)

​मुलांना आपले प्रेम न दर्शविणे​

​मुलांना आपले प्रेम न दर्शविणे​

असं अनेकदा पाहण्यात येतं की वडील जास्त भावना दर्शवत नाहीत. याचा अर्थ वडील प्रेमच करत नाहीत असा होत नाही. पण ते दर्शविण्याचीही गरज असते. आता बऱ्याच वडिलांमध्ये बदलही दिसून येतो. आपल्या मुलांना त्यांच्यावरील प्रेमाची जाणीव करून देणं गरजेचे आहे. यामुळे मुलांना वडिलांप्रती अधिक प्रेमाची भावना उत्पन्न होते.

मुलांना वाढविण्यासाठी आणि त्यांना योग्य संस्कार देण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे मुलांना वेळ देणे. त्यांच्यासह कठोर न वागता काय योग्य आणि अयोग्य याची योग्य शब्दात जाणीव करून देणे, त्यांना उदाहरणातून मदत करणे. यामुळेच वडील आणि मुलांचे नाते अधिक घट्ट होऊ शकते.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …