सोनं की सोव्हेरियन गोल्ड? तरुणांनी कुठे करायला हवी गुंतवणूक? जाणून घ्या

Gold Vs Sovereign Gold Bonds: आजकालच्या तरुणांमध्ये गुंतणवुकीप्रती कल वाढलेला दिसतो. कोणी एफडी, एनपीएस तर कोणी म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणुक स्किममध्ये सेव्हिंग करतात. तरुण हे आपल्या भविष्याप्रती जागरुक असल्याचे यातून दिसतंय. भविष्यकालिन सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा पारंपारिक मार्ग आहे. लोक अनेक वर्षांपासून सोन्यात गुंतवणूक करत आहेत आणि आजही हा ट्रेंड कायम आहे. सणासुदीला, शुभ प्रसंगी आपल्याकडे थोडे थोडके का होईना पण सोने घेतले जाते.  ृकाळाबरोबर सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, आता केवळ भौतिक सोनेच नव्हे तर डिजिटल सोने, सार्वभौम सुवर्ण रोखे इत्यादी अनेक मार्गांनी गुंतवणूक केली जाऊ शकते. पण यातील कोणती गुंतवणूक उत्तम आहे, हे अनेकांना माहिती नसते.

1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या मुलांना जेन झेड असं म्हणतात. या मुलांनी नुकतीच कमाई सुरू केली आहे किंवा लवकरच कमाई सुरू करणार आहेत. ही मुले गुंतवणुकीसाठी चांगल्या पर्यायांच्या शोधात असतात. या जनरेशनला भविष्यात फायदेशीर ठरेल अशा सोन्यातील गुंतवणुकीबद्दल जाणून घेऊया.

सोन्यात पैसे गुंतवायचे असतील, तर त्यांच्यासाठी दोन पर्यायांपैकी कोणते पर्याय आहेत त्यांच्यासाठी चांगले आहे का? याबद्दल झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक अनिल सिंघवी टीप्स दिल्या आहेत.

हेही वाचा :  “आता १० रुपयांच्या गोळ्या घेतानाही विचार करावा लागेल”, जितेंद्र आव्हाडांचा ईडीवर निशाणा; म्हणाले, “जेव्हा नितीन गडकरींवर…!”

अनेक गुंतवणुकीदार असे असतात, ज्यांना आपल्या गुंतणवुकीत कोणती जोखीम घ्यायची नसते. तुम्ही यापैकी एक असाल तर एफडी, पीएफ आणि सोने इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता. एफडी आणि पीएफमधून मिळणारे परतावा वाढत्या महागाईला मात देत नाही. सोन्यातील गुंतवणूक ही ‘मध्यम जोखीम मध्यम परतावा’ श्रेणीत येते. सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर महागाईच्या बरोबरीने परतावा मिळेल. 

दिवसेंदिवस महागाई दर वाढत आहे. तुम्हाला वाढत्या महागाईवर मात करायची असेल तर सोन्याऐवजी, भारत सरकारने जारी केलेले सार्वभौम सुवर्ण बाँड हा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरु शकतो.

सोन्याचे मूल्य जसजसे वाढेल तसतसे या बॉण्ड्सचे मूल्यही वाढेल. यासोबतच सरकारकडून तुम्हाला 2.5 टक्के दराने व्याजही मिळते. अशाप्रकारे सोव्हेरियन गोल्ड बाँड स्किममध्ये गुंतवणूक केल्याचा तुम्हाला दुहेरी फायदा होतो. दिवसा सोन्याची किंमतही वाढते आणि तुम्हाला वार्षिक 2.5 टक्के व्याज देखील मिळते.

सोव्हेरियन गोल्ड बॉण्ड कसे खरेदी करायचे?

बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून तुम्ही सोव्हेरियन गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकता. पोस्ट ऑफिसमधूनही तुम्हाला ते खरेदी करता येतील.होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे स्टॉक खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच बीएसई आणि एनएसई प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करण्याचा पर्याय आहे.

हेही वाचा :  Cooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी

किती सोने खरेदी करू शकता?

कोणतीही व्यक्ती सोव्हेरियन गोल्ड बॉण्डद्वारे आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची गुंतवणूक करू शकते. गोल्ड बाँडचा कालावधी बाँड जारी केल्याच्या तारखेपासून 8 वर्षे इतका आहे. 

असे असले तरी तुम्ही सोव्हेरियन गोल्ड बॉण्डमधील गुंतवणूक प्री-मॅच्युअर रिडम्प्शन 5 वर्षांनंतर करता येते. बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजे बीएसई आणि एनएसईमध्ये सॉवरेन गोल्ड बाँड विकू शकता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Lok Sabha polls : कुठं पैसेवाटप, तर कुठं राडा! चक्क बोगस मतदान; मतदानाचा चौथा टप्पा गोंधळाचा

Maharasra Politics Over Lok Sabha polls : महाराष्ट्रात पहिल्या तीन टप्प्यात अपवादात्मक प्रकार वगळता मतदान …

एफडी, सेव्हिंगमधून करा मोठी कमाई! कोणती बॅंक देते जास्त व्याज? जाणून घ्या

Bank Intrest Rates: भविष्यासाठी सुरक्षित रक्कम ठेवायची असेल तर बहुतांश लोक फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय निवडतात. …