विधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल

Share Market: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय. सोमवारी शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून येत आहे. याशिवाय इतर देशांतर्गत आणि जागतिक निर्देशकही सकारात्मक आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य गुंतणवणूक दारांना काय फायदा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही या संधीचा फायदा लॉंग टर्म गुंतणवणूकीसाठी करु शकता. काही शेअर्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. मोठी हालचाल होऊ शकते अशा 10 शेअर्सची यादी देण्यात आली आहे. गुंतवणूक उद्देशाने यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. या शेअर्समध्ये हिंदुस्तान झिंक, आस्क ऑटो, ब्रिगेड एनटी, एचयूएल, अल्केम लॅब्स, ग्रॅन्युल्स, टाटा पॉवर, सीमेन्स, सीएएमएस, हिरो मोटो, आयशर मोटर्स यांचा समावेश आहे. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 

हिरो मोटो/आयशर मोटर्सच्या एकूण विक्रीमध्ये 26 टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून येत आहे. नवरात्री आणि भाई दूज दरम्यान 32 दिवसांमध्ये विक्रमी उत्सवी विक्री पाहायला मिळाली.आयशर मोटर  रॉयल एनफिल्डची विक्री 13.4% वाढलेली मिळाली. 

सीएएमएस प्रमोटर ग्रेट टेरेन इन्व्हेस्टमेंट (वारबर्ग पिंकसचे संलग्न) च्या ८% किंवा त्याहून अधिक स्टेकची विक्री शक्य आहे. याची बेस इश्यू साइज 1000 तर फ्लोअर प्राइज 2550/ शेअर असेल. (CMP कडून 8.6% सूट). प्रमोटर ग्रेट टेरेन इन्व्हेस्टमेंट लिमिटेडकडे सध्या 19.87% हिस्सा आहे.

हेही वाचा :  पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर ! गजा मारणे, बाबा बोडके, घायवळ यांच्यासह कुख्यात गुंडांची परेड

सीमेन्स AG, जर्मनी सिमेन्स एनर्जी होल्डिंग बीव्हीकडून कंपनीचे 18 टक्के म्हणजेच 6.41 कोटी शेअर्सची भागीदारी 2952.86/शेअर दराने खरेदी करेल (CMP च्या 21% सूट) 8 डिसेंबर रोजी किंवा नंतर भागभांडवल खरेदी करेल.

टाटा पॉवरने बिकानेर-नीमराना ट्रान्समिशन प्रकल्प ताब्यात घेण्याची बोली जिंकली1544 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आणि तो बांधा-ओन ऑपरेट-हस्तांतरण (BOOT) तत्त्वावर बांधला जाईल. कंपनी 35 वर्षे ट्रान्समिशन प्रोजेक्टची देखभाल करेल.

ग्रॅन्यूल कंपनीला USFDA कडून सिल्डेनाफिलसाठी ANDA मंजूरी मिळाली.हे औषध फुफ्फुसाच्या धमनी उच्च रक्तदाबच्या उपचारांमध्ये वापरले जातेसिडेनाफिलची सध्याची वार्षिक यूएस मार्केट 357.8 कोटी रुपये आहे.

अल्केम लॅब्स- US FDA ने मांडवा येथील कंपनीच्या API उत्पादन सुविधेची तपासणी केली. तपासणीनंतर, फॉर्म 483 (कोणतेही डेटा अखंडता निरीक्षण नाही) सह 3 आक्षेप जारी केले गेले. 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान तपास झाला

एचयूएल ही सौंदर्य आणि पर्सनल केअर (BPC) विभाग 2 व्यवसायांमध्ये बदलणार आहे. बीपीसी व्यवसाय सौंदर्य आणि आरोग्य (B&W) आणि पर्सनल केअर (PC) मध्ये बदलणार आहे. हे बदल 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील.

ब्रिगेड Entकंपनीने बंगळुरूमध्ये ‘ब्रिगेड सॅन्चुरी’ नावाचा निवासी प्रकल्प सुरू केला. नवीन प्रकल्पातून 2,000 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे

हेही वाचा :  'शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 'इतका' खर्च, राज्य सरकारची कबुली

एएसके ऑटोचा नफा 15.4% डाऊन तर महसूल 6.4% वर आहे. 

हिंदुस्थान झिंक कंपनी 6 डिसेंबर रोजी बोर्डाच्या बैठकीत दुसऱ्या अंतरिम लाभांशाचा विचार करेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …