Tag Archives: maharashtra news

असे कसे कार्यकर्ते? नेत्याला थंडी लागली म्हणून रेल्वे डब्यातच पेटवली शेकोटी!

Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये …

Read More »

एकत्र जळल्या 2 भावांच्या चिता! लोकं अश्रू ढाळत म्हणाले, ‘हे तर कलियुगातील राम-लक्ष्मण!’

Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि  तुमचे डोळे पाणावतील.  वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी …

Read More »

कॉंग्रेसला खिंडार पाडण्याच्या तयारी! भाजपकडून ऑफर आल्याचा ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

Congress Leader Sushilkumar Shinde: कॉंग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपुर्वीच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता भाजपकडून कॉंग्रेसला खिंडार पाडण्याची तयारी सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. आपल्याला भाजपकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट खुद्द काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.  अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी …

Read More »

‘तू वांझ आहेस…’ रोजच्या टोमण्यांना वैतागून महिलेने बाळ चोरले नंतर स्वतःच पोलिसात गेली आणि…

Mumbai News: कांदिवली पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर रुग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाचे अपहरण केले होते. महिलेने बाळाचे अपहरण तर केले मात्र, नंतर असं काही घडलं की महिलेने थेट पोलिस ठाणे गाठले व बाळ पोलिसांकडे स्वाधीन केले. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत महिलेला अटक केली आहे.  …

Read More »

भाजपचा लोकसभेचा फॉर्मुला ठरला, 32 जागांवर भाजपचेच उमेदवार; शिंदे, दादांना किती जागा?

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याची देशात उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यातही निवडणुकीचे पडसाद उमटायला लागले आहेत. भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या भाजप-शिवसेना (शिंदे गट)- राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीतही महायुती लढणार आहेत. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाच्या चर्चांवरुन वातावरण तापलं होतं. मात्र, अखेर भाजपकडून जागावाटपाचा …

Read More »

Gold Rate Today: लग्नसराईसाठी दागिने घेण्याची आज सुवर्णसंधी; सोने-चांदीचे आजचे भाव जाणून घ्या!

Gold Silver Rate: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अनेकांना दागिने घडवण्याची घाई दिसून येत आहे. त्यामुळं सोन्याला मोठी मागणी आली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याच्या दरात वाढ झाल्याने दागिने खरेदीची चिंता वाढली होती. मात्र, संक्रांतीच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात घट झाल्याचं दिसतंय. त्यामुळं सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्याच्या दरात कोणाताही बदल झालेला …

Read More »

‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Milind Deora News Today: माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला दिवस असतानाच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. मिलिंद देवरांच्या या राजीनाम्याच्या टायमिंगवरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.  काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी रविवारी मिलिंद देवरा यांच्यावर गंभीर आरोप केला …

Read More »

राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही देवरांनी काँग्रेसचा ‘हात’ का सोडला? उद्धव ठाकरेंमुळं राजीनामा?

Milind Deora News Today: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा हे शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे जवळचे शिलेदार समजले जात होते. असं असताना मिलिंद देवरा यांनी राजीनामा का दिला, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुल गांधी …

Read More »

‘बाळासाहेब असते तर जोड्याने…’; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत घराणेशाहीवरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. तरुणांना राजकारणात येण्याचा सल्ला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या येण्याने घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात येईल, असं म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. आता या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील चिखली …

Read More »

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरांचा आज शिंदे गटात पक्षप्रवेश?

Former Congress MP Milind Deora: लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगावू लागले आहेत. अशावेळी सर्वच राजयकी पक्ष आणि त्यांचे संभाव्य उमेदवार आपले खुंटे बळकट करण्याच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी सुरक्षित मतदार संघ आणि प्रत्येक पक्ष आपल्यासाठी भक्कम उमेदवाराच्या शोधात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे …

Read More »

RBI कडून ‘या’ बॅंकेचा परवाना रद्द तर 3 बॅंकाना पेनल्टी; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

RBI Imposes Penalty: तुमचे खाते कोणत्या बॅंकेत आहे? ही बॅंक आरबीआयच्या रडारवर तर नाही ना?  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय सध्या अॅक्शन मोडमध्ये आहे. आरबीआयने एका बॅंकेवर परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.  कोणती आहे ही बॅंक? का झालीय ही कारवाई? याचा संबंधित बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होईल? इतर खातेधारांनी बॅंक निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून …

Read More »

‘इट्स लव्ह, नॉट लस्ट…’, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं मंजूर केला जामीन

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अल्पवीयन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 26 वर्षीय आरोपीला जामीन मंजूर केला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, आरोपीने वासनेतून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे हे प्रकरण नाही. दोघेही वासनेवर नव्हे तर प्रेमावर …

Read More »

नको तिथे नियमांना प्राधान्य यालाच म्हणतात का? बेड रिडन व्यक्तीला हक्काच्या पेन्शनसाठी काय करावं लागलं पाहा

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सरकारी कामकाजात सर्वसामान्यांना कायमच वाट पाहावी लागते. यामध्ये आता अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांवरही हीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत एका रुग्णाला त्याच्या पेन्शचे पैसे मिळवण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागला आहे. आधीच वेदना सहन कराव्या लागत असताना रुग्णाने आपण जीवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी सरकारी कार्यालयापर्यंत रुग्णवाहिकेपर्यंत प्रवास केला आहे. पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी …

Read More »

नागपुरात रिमोटचा वापर करुन उद्योजकांनी चोरली वीज; सात जणांवर गुन्हा दाखल

Nagpur News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने (महावितरण) नागपुरात मोठी कारवाई केली आहे. नागपुरात महावितरण आणि लष्करीबाग उपविभागाच्या भरारी पथकाने संयुक्तपणे मोहीम राबवून सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याची समोर आणलं आहे. या सात उद्योगपतींनी तब्बल 52.55 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आलं आहे. नारी आणि कामठी रोड परिसरातील सात उद्योजकांनी तब्बल 3 लाख 14 हजार 753 युनिटची वीज …

Read More »

पॉर्न पाहून पती व्हायचा हैवान; नशेची गोळी देऊन बंद खोलीत…’ अंगावर शहारा आणणारी घटना

UP Crime: देशात विशेषत: घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही घटनांची पोलीस नोंद होते. पण पोलीस नोंद न होणाऱ्या, जगासमोर न येणाऱ्या घटनांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असते. अशा अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. समाज इभ्रतीमुळे त्यांच्याकडून घटनांची वच्चता केली जात नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात …

Read More »

विद्यार्थी ‘येस मॅडम’ऐवजी म्हणतयात ‘जय श्रीराम’, शाळेतला व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

Jay ShreeRam In School: अयोध्येतीम मंदिरात 22 जानेवारीला रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक घरांतून अयोध्येला जाण्याची तयारी केली जात आहे. लग्न तसेच विविध सोहळ्यात प्रभू श्रीरामासंबंधी गाणी वाजवली जात आहेत. आता एका शाळेतून प्रभू श्रीरामाच्या नावाच्या घोषणा दिल्याचे समोर आले आहे.   एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. …

Read More »

‘खरी शिवसेना’ शिंदेंचीच निकालाने शिंदेंपेक्षा मोठा दिलासा अजित पवारांना, कारण महिन्याभरात…

Shiv Sena MLA Disqualification Result Ajit Pawar Group Impact: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीवरुन निर्माण झालेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहणार आहे. मात्र या निकालामुळे शिंदे गटाहून अधिक मोठा दिलासा अजित पवाराला मिळाला आहे. …

Read More »

‘…म्हणून आता आम्हाला उत्तम संधी’; ठाकरेंविरुद्ध निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On Shiv Sena MLA Disqualification Result: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत बंड पुकारणाऱ्या 16 आमदारांना निलंबित करण्याची केलेली कारवाई योग्य नसल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलेल्या निकालात म्हटलं आहे. शिवसेनेमधील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंना नसून मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. …

Read More »

‘मी पुन्हा सांगतो, हे…’; ‘खरी शिवसेना’ शिंदेंचीच निकालानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Shiv Sena MLA Disqualification Result: शिवसेनेमधील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंना नसून मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. तसेच वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या गटाच्या …

Read More »

‘लोक समजून घेतील तुम्ही इकडे या’; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर

Political News : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यानंतर सगळी राजकीय समीरणं 360 अंशांनी फिरली. पाहता पाहता परिस्थिती बदलली, राजकीय पटलावर अनेक चाली चालल्या गेल्या आणि एकनाथ शिंदे राज्याच्या विराजमान झाले. शिवसेनेतील आमदारांच्या मोठ्या फळीनं पक्षात बंड करत शिंदेंना साथ दिली, त्या क्षणापासून आमदार अपात्रतेचा मुद्दा डोकं वर काढत …

Read More »