Tag Archives: maharashtra news

‘ही वस्तुस्थिती आहे की…’; छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

Chhagan Bhujbal Resignation : ओबीसी मेळाव्याआधीच 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत असताना भुजबळांनी नगर येथील ओबीसी एल्गार परिषदेत हा गौप्यस्फोट केला. भुजबळ यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता छगन भुजबळांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय …

Read More »

सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान- शरद पवार

Sharad Pawar: सत्तेत असण्यापेक्षा विरोधात असण्यात अधिक समाधान असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. प्रताप पवार यांनी लिहिलेल्या ‘अनुभवे आले’ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. याठिकाणी माझं वय 85 सांगितलं गेलं. मी प्रत्यक्षात 84 वर्षांचा आहे. माझं वय विनाकारण एक वर्षाने वाढवण्यात आलं, अशी फटकेबाजी …

Read More »

भाच्याच्या मोबाईलवर प्रियकराचा फोन आला अन्… नगरमध्ये पत्नीने काढला पतीचा काटा

दत्तात्रय गडगे, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ खून प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणात पत्नीच सुत्रधार असल्याचे समोर आल्यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  30 जानेवारी …

Read More »

पेटीएम कायमचे बंद होणार ? संस्थापक म्हणाले, ‘तुमचे आवडते अ‍ॅप…’

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: आरबीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेत 31 जानेवारी 2024 पासून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पेटीएमच्या सेवा स्थगित केल्या. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला पेटीएम वॉलेटमध्ये पैसै टाकता येणार नाहीत. पेटीएमच्या ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नयेत, त्यांना माहिती मिळावी यासाठी कंपनीने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.  पेटीएमचे संस्थापक आणि …

Read More »

मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला …

Read More »

Video: पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्याला बाईकस्वाराने उडवलं; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : भरधाव वाहनांमुळे अनेक अपघाच्या घटना रोज समोर येत असतात. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व देखील येतं. अशातच पुण्यातून अपघाताची अशीच एक भीषण घटना समोर आली आहे. पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक अपघाताची घटना एका …

Read More »

सुट्टी संपवून परतलेल्या जवानाला पहिल्याच दिवशी वीरमरण; नाशिकच्या सुपुत्राचा लडाखमध्ये मृत्यू

निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या मांडवड गावातील भारतीय सैन्यातील एका जवानाला लडाखमध्ये वीरमरण आलं आहे. कर्तव्यावर असताना नाशिकचा हा सुपुत्र शहीद झाला आहे. नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील संदीप भाऊसाहेब मोहीते (33) यांस लेह येथे वीरमरण आले. जवान संदीप मोहितेंचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संदीप मोहितेंच्या निधनाने नाशिकवर शोककळा पसरली आहे. भारतीय लष्करातील लेह …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अपघात; नागरिकांना ज्वलनशील वस्तूचा वापर न करण्याच्या सूचना

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौकात मोठा अपघात झाला आहे. गॅसने भरलेल्या टॅंकरचा अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरु केली आहे. दरम्यान या परिसरातील नागरिकांना देखील प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना दिल्या असून त्याचे पालन करण्यास सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको चौक भागात एका टँकरचा अपघात …

Read More »

अजित पवारांचे नाव असलेल्या घोटाळ्याची फाईल पोलिसांकडून क्लोज; रोहित पवारांची चौकशी मात्र सुरु

Maharashtra Politics: शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात नावे असलेल्या आरोपींना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला. याच गुन्ह्याच्या आधारावर  रोहित पवारांची देखील याच प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर यात पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. मात्र, शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा तपास …

Read More »

कमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: नवरा-बायकोतील भांडणे ही नेहमी होतच असतात. प्रत्येक घरात भांड्याला भांड हे लागतच असते. मात्र कधी कधी पती पत्नीचे वाद हे इतके विकोपाला जातात की काहीतरी भयंकर घडते. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. पती-पत्नीच्या वादानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.  पती आणि पत्नीच्या वादानंतर पत्नीने रागाच्या घरात पतीच संपूर्ण घरच पेटवून …

Read More »

…तर काढता येणार नाहीत पेन्शनचे पैसे; 1 फेब्रुवारीपासून बदलणार तुमच्या पेन्शनसंदर्भातील नियम!

NPS Partial Withdrawal: कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ऑफिसमधून पीएफ कापला केला जातो. पण ज्यांचा पीएफ पगारातून कापला जात नाही ते नॅशनल पेन्शन स्किमचा पर्याय निवडतात. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक लॉंग टर्म गुंतवणूक आहे. यासंदर्भात पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथोरिटी (PFRDA) ने यासंदर्भात एक महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीएससंदर्भात एक नवा नियम लागू होणार आहे. एनपीएस …

Read More »

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत बंपर भरती, पदवीधरांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

New India Assurance Job: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड बंपर भरती सुरु आहे. या अंतर्गत उमेदवारांना चांगला पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.एनआयएआरच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत असिस्टंट पदांच्या …

Read More »

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार ‘ही’ चाल

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 56 जागांसाठी 16 राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 6 जागांचं भवितव्य ठरणार आहे. 6 पैकी 5 जागा काबिज करण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात येतोय. तर महाविकास आघाडीला दोन जागांसाठी मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान हे खुल असल्याने यात राज्यात पक्षादेश म्हणजे …

Read More »

नासाच्या लॅबमध्ये 8 एलियन्सचे मृतदेह; कोणाला सापडले कसे दिसतात? सर्वकाही जाणून घ्या

Aliens Deadbody: एलियन्स हा जगातल्या प्रत्येकासाठी औत्सुक्याचा विषय ठरतो. एलियन्स कोणी पाहिले नाहीत, जगात एलियन्सच्या अस्तित्वाबाबत विविध दावे करण्यात आले आहेत. त्यांचे एक वेगळे विश्व असल्याचे मानले जाते. त्यात आता एलियन्सच्या डेड बॉडी सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एलियन्स कसे दिसतात हे प्रत्यक्ष पाहिले नाही पण मग त्यांच्या डेड बॉडी कशा दिसत असतील? याबद्दल अनेकांच्या …

Read More »

1 महिना मोबाईल न वापरणाऱ्यास 8 लाखांचे बक्षिस, ‘येथे’ पाठवा अर्ज!

Digital Detox: जगभरात मोबाईल युजर्सची संख्या अगणित आहे. मोबाईलचा वापर न केलेला व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. सकाळच्या आलार्मपासून ते रात्री सोशल मीडिया स्क्रोलिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला मोबाईलची मदत लागते. या मोबाईलपासून आपण किती वेळ दूर राहू शकतो? 1 दिवस?, 2 दिवस? अशक्य वाटतंय ना? पण तुम्हीजर 1 महिना हे काम करुन दाखवलात तर 8 लाख रुपये तुमचे होऊ शकतात. …

Read More »

तव्यावर बसून समस्या सोडवणारा बाबा निघाला बलात्कारी; विवाहितेवर 90 दिवस करत होता अत्याचार

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदासबाबा उर्फ सुनील कावलकर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदासबाबानो मध्य प्रदेशातील एका महिलेवर तब्बल तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांत गुरुदासबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवत …

Read More »

भारतीय रेल्वेमध्ये ‘मराठी तरुण-तरुणींना’ संधी; राज ठाकरेंनी केली महत्त्वाची पोस्ट

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच रोजगाराच्या मुद्द्यावर भाष्य करत असतात. मराठी भाषेसह मराठी मुलांना रोजगार मिळावा यासाठी राज ठाकरे सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रोजगाराच्या प्रश्नाबाबत राज ठाकरे यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. आता राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीबाबत सोशल मीडियावर महत्त्वाची पोस्ट केली आहे. भारतीय रेल्वे …

Read More »

‘डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत’; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर

Maratha Reservation : गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला शनिवारी यश आलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र यावरुन आता मंत्री छगन भुजबळ …

Read More »

दीड टनाचा हिंदकेसरी रेडा! इंदापूर कृषी प्रदर्शात गजेंद्रला पहायण्यासाठी तुफान गर्दी

जावेद मुलाणी, झी मिडीया, इंदापूर : दररोज १५  लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. २४  जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवात  कृषी, …

Read More »

आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच, आंतरवालीत जरांगेंच्या 4 मोठ्या घोषणा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमधून 4 महत्वाच्या घोषणा केल्या. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर महादिवाळी साजरी करणार …

Read More »