छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा अपघात; नागरिकांना ज्वलनशील वस्तूचा वापर न करण्याच्या सूचना

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौकात मोठा अपघात झाला आहे. गॅसने भरलेल्या टॅंकरचा अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरु केली आहे. दरम्यान या परिसरातील नागरिकांना देखील प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना दिल्या असून त्याचे पालन करण्यास सांगितले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको चौक भागात एका टँकरचा अपघात झालाय. या टॅंकरमध्ये गॅस असल्याने तो लिक होऊ नये तसेच त्याचा स्फोट होऊ नये म्हणून त्यावर पाणी टाकण्यात येत आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून जवळपास दोन किलोमीटरचा परिसर पोलिसांनी कॉर्डन ऑफ केला आहे. या परिसरात कुणालाही जाऊ दिले जात नाहीये. तसेच परिसरातील लाईट सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. हायकोर्टापासून सिडको उड्डाणपुलाच्या पलीकडे चारही बाजूंनी रस्ते पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत. 

या सोबत प्रशासनाने कोणताही अपघात होऊ नये म्हणून नागरिकांना काही सूचना देखील दिल्या आहे. तसेच परिसरातील वीज पूर्ण बंद करण्यात आली आहे,नागरिकांनी परिसरात येऊ नये घरात राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना :-

हेही वाचा :  दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता...

एन 3 परिसरात गॅस टँकर उलटला असून त्यातून गॅस गळती होत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून सिडको परिसरातील नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये.

घरात ज्वलनशील वस्तूचा वापर करू नये.

शहरातील नागरिकांनी जालना रोड सिडको परिसरात वाहने नेऊ नये.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाना सहकार्य करावे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : अखेरीस गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत प्रतिनिधीत्व करतील. यातील दोन जागा असतील …

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …