Tag Archives: maharashtra news

BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स

Success Story Tariq Premji: वडील देशातील मोठे उद्योजक पण त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बीपीओमध्ये काम करण्याला प्राधान्य दिले. मेहनत करत राहिला. एक दिवस वडिलांनी तब्बल 2500000000  किंमतीचे म्हणजेच 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या तरुण मुलाला गिफ्ट केले. आज तो तरुण मोठ्या उद्योग व्यवसायाचा मालक बनलाय. याबद्दल जाणून घेऊया.  अझीम प्रेमजी हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत. स्वत:च्या उद्योगाप्रती …

Read More »

Maratha Reservation | ‘छातीवर हात ठेवून सांगा…’, विनोद पाटलांची रोखठोक भूमिका, भुजबळांवर टीका करत म्हणाले…

Vinod Patil On Chhagan Bhujbal  : शिंदे सरकाराने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  बाबतीत काढण्यात आलेल्या अध्यादेशावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अनेकांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय तर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हणतात आणि मागच्या दारानं एन्ट्री करतात, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Bhujbal on Maratha Reservation) यांनी केली होती. त्यावरून …

Read More »

Govt Job: दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

ISRO Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. यासाठी इस्रोकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल …

Read More »

मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या ‘सगेसोयरे’ शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र आता या अध्यादेशावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही तरतूद आधीपासूनच होती असे …

Read More »

पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार

SCI Bharati: पदवीधर असून चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणार शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला …

Read More »

‘तेव्हाच भाजपबरोबर सरकारमध्ये जायचं ठरलं’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्यातल्या राजकारण गेल्या काही महिन्यांपासून ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर टीका सुरु आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एका त्यांना लक्ष्य केले आहे. जुन्नरमध्ये बोलताना अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबाबत भाष्य केलं आहे.अजित पवारांनी पक्ष सोडून …

Read More »

पहिली पास कर्मचाऱ्याला मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम; अधिकारी म्हणतात, ‘तुमचं तुम्ही बघा..’

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे सरकारकडून मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र या सर्वेक्षणावरुन नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. काही ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलं नसल्याचं समोर आलं आहे. …

Read More »

उद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार

Ayodhya Ram Mandir Business: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशातील लाखो रामभक्तांमध्ये यामुळे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेत सनातनच्या अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला गेला. लवकरच देशभरात याचा जलद विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी, उद्योजकांवर श्रीरामाची कृपा राहिल्याचे दिसून आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अयोध्या  श्रीराम मंदिरामुळे देशात सुमारे 1.25 …

Read More »

नव्याकोऱ्या थारमधून बीटेक पाणीपुरीवाली खेचतेय स्टॉल; व्हिडीओ पाहून आनंद्र महिंद्रा म्हणतात, ‘आमच्या गाड्या…’

BTech Pani Puri Wali: ग्रॅज्युएट वडापाव, एमबीए चहावाला असे अनेक तरुण व्यावसायिक आपल्याला माहिती झाले आहेत. यांनी आपल्या कल्पकतेमुळे सोशल मीडियात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच कल्पक विचार करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देत असतात. ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगळं काहीतरी करणाऱ्यांना प्रसिद्धी देतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्यात ‘बीटेक पाणीपुरी वाली’ महिंद्रा थारवर आपला स्टॉल …

Read More »

ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?

What is Rohit Pawar Baramati Agro Ltd Money Laundering Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar)  यांना आज मुंबईमधील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यलयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.  या निमित्ताने शरद पवार गटाने शक्तीप्रदर्शन केलं आहे. शरद पवार हे स्वत: बेलार्ड पियर्स येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत बसून राहणार आहेत. …

Read More »

Drugs in Maharashtra : महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.   तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच …

Read More »

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा …

Read More »

कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न पुरस्कार, कोण आहेत? जाणून घ्या

Bharat Ratna Karpuri Thakur:भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.  कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी …

Read More »

नवी मुंबई पालिकेत दहावी, बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NMMC Recruitment 2024: दहावी, बारावी उत्तीर्ण असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. नवी मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून येथे दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी करता येणार आहे. चांगले पद आणि नोकरी मिळवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. यासाठी कोणती परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  नवी मुंबई …

Read More »

रुग्णालय उपचार करण्यास टाळाटाळ करतंय? घाबरु नका! धर्मादाय आयोग करणार कारवाई

Charity Hospitals: निर्धन, दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यासाठी उच्च न्यायालयाने योजना तयार केली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर आता करवाईचा बडगा उभारला जाणार आहे.उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील 468 धर्मादाय रूग्णालयांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या …

Read More »

रामललाचा जन्मदिन मिळावा म्हणून रुग्णालयात थांबल्या डिलीव्हरी; पुढे जे घडले ते ऐकून वाटेल आश्चर्य!

Deliveries halted For Ramlalas Birth: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी हा भव्य सोहळा संपूर्ण देशाने पाहिला. तसेच लाखो रामभक्तांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. मागच्या अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहिली जात होती. दुसरीकडे पटनातील रुग्णालयात एक वेगळीच लगबग पाहायला मिळाली. रामललाचा जन्मदिवस लाभावा म्हणून रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती रोखण्यात आल्या होत्या.  आपल्या होणाऱ्या बाळाचा …

Read More »

‘…तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल’; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणा आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील 20 जानेवारीपासून जालना जिल्ह्यातून रवाना झाले आहेत. मनोज जरांगे-पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, …

Read More »

33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम

Ram Mandir Inauguration: मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. 33 हजार 258 पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज …

Read More »

टोमॅटोच्या झाडाला लागले बटाटे! बारामतीत शेतीचा अफलातून प्रयोग

जावेद मुलाणी, झी मिडिया, बारामती : बारामतीतील माळेगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनाचा आज तीसरा दिवस असून,यंदाच्या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना नव्यानेच व देशात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे. यात पोमॅटो ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे. टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आलं आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असून …

Read More »

बाबरी पडताना नाव बदलून वाचवला होता जीव; नागपुरातल्या मुस्लिम कारसेवकाची कहाणी

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तासांचा अवधी उरला आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. देशभरात या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने देभरात राम मंदिरासाठी झटलेल्या कारसेवकांचादेखील सत्कार केला जात आहे. यावेळी अनेक कारसेवकांनी आपले अनुभव सांगितले आहेत. नागपुरातील एका …

Read More »