उंदीर आणि किडे मारण्याचे सोपे घरगुती उपाय, होतील ५ मिनिट्मध्ये गायब

उंदीर वा किडे घरात कसे येतात?

बरेचदा आपण आपल्या घरात एखादी जागा अडगळीची बनवतो. तिथे लक्ष देत नाही आणि पसारा वाढतो. अशा ठिकाणी एखाद्या गॅपमधून बाहेरून उंदीर येतात अथवा अशा ठिकाणी काही सांडले असेल तर मुंग्यांची वा किड्यांचीही निर्मिती होत असते. त्यामुळे सहसा अशी अडगळीची खोली बनवू नये आणि असेल तरीही नियमित स्वच्छ ठेवावी. कधीतरी स्वयंपाकघर अथवा बेडरूची खिडकी चुकून उघडी राहिली तर पाल, झुरळ, उंदीर यांचा घरात प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपतानाच २ – ३ वेळा खिडकी उघडी नाही ना कोणत्याही दाराला गॅप नाही ना? याची खात्री करूनच झोपावे.

सोपा घरगुती उपाय ठरेल वरदान

किडे, किटक आणि उंदीर मारण्यासाठी आम्ही सांगत असणारा हा घरगुती उपाय नक्की कामी येऊ शकतो. यासाठी तुम्हाला काही साहित्य लागेल. त्याची माहिती करून घ्या.

साहित्य

  • मातीचे एक लहान मडके (भाजीसाठी वापरण्यात येते तशा स्वरूपाचेही चालेल)
  • ५-६ तमालपत्र
  • कडिलिंबाचे तेल अथवा मोहरीचे तेल
  • कापूर
हेही वाचा :  Home Remedies : काळे पडलेले ढोपरे, कोपर आणि मान मिनिटात करा स्वच्छ, घरच्या घरी तयार करा Beauty Pack

(वाचा – कमी खर्चात करा घराचा मेकओव्हर, इंटिरिअर डिझाईनचा येईल लुक)

झुरळं, उंदीर आणि मुंग्या मारण्याचा उपाय

साहित्य

  • थोडेसे गव्हाचे पीठ
  • अर्धा चमचा साखर
  • बोरीक अॅसिड
  • नारळाचे अथवा नेहमीचे घरातील तेल

(वाचा – डाळी आणि गहूला लागलेल्या टोक्यांपासून हैराण झालात? अगदी सोपे आणि घरगुती 9 किचनमधील खास टिप्स)

यासाठी काय करावे?

वरील सर्व साहित्य मिक्स करा आणि पीठ व्यवस्थित घट्ट भिजवा. यामध्ये बोरीक अॅसिडचे प्रमाण जास्त ठेवा. याचे लहान लहान गोळे बनवा आणि ते स्वयंपाकघरात किडे येत असतील अथवा उंदीर येत असतील अशा ठिकाणी ठेवा. किचन सिंक, बाथरूमचा कोपरा, गॅलरीतील कोपरे अशा ठिकाणी झुरळं, किटक आणि उंदरांचा जास्त वावर असेल अशा ठिकाणी ठेवा. हे गोळे उंदीर, किटक आणि झुरळं खाऊन त्वरीत मरतात.

या दोन सोप्या उपयांचा तुम्ही वापर करावा आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला याचा उपयोग झाला की नाही? घरातील उंदरांना आणि किटक-मुंग्यांना पळवून लावण्याचा आणि मारण्याचे हे सोपे घरगुती उपाय आहेत.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

हेही वाचा :  आंबट न घालताही बनवा स्वादिष्ट दही, कसं ते जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती …

‘संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात’, कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले ‘हा बोलतोय ते…’

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून …