ED चौकशी करत असलेला Baramati Agro घोटाळा नेमका काय? रोहित पवारांशी काय कनेक्शन?

What is Rohit Pawar Baramati Agro Ltd Money Laundering Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar)  यांना आज मुंबईमधील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यलयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.  या निमित्ताने शरद पवार गटाने शक्तीप्रदर्शन केलं आहे. शरद पवार हे स्वत: बेलार्ड पियर्स येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत बसून राहणार आहेत. रोहित पवार यांना कार्यालयामध्ये सोडण्यासाठी त्यांची आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे आल्या होत्या. रोहित पवारांच्या या ईडी चौकशीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र ज्या बारामती ॲग्रो प्रकरणात ही चौकशी केली जाणार आहे ते नेमकं आहे तरी काय? याची कल्पना अनेकांना नाही. त्यावरच नजर टाकूयात…

बारामती ॲग्रो आणि ते 5 कोटी

राजकीय नेत्यांनी कथितपणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला  फसवल्याचे प्रकरण मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून म्हणजेच 2012 पासून गाजत आहे. या प्रकरणी 2020 मध्ये, मुंबई पोलिसांनी सर्व संबंधितांना ‘क्लीन चिट’ दिलेली. मात्र या निर्णयाला ईडीने न्यायालयात याचिका दाखल करत विरोध केला. कन्नड सहकारी साखर कारखाना हा आजारी कारखाना असून या कारखान्याची खरेदी करण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीला बारामती ॲग्रोने ‘कॅश क्रेडिट अकाउंट’मधून 5 कोटींची रक्कम देऊन बोली लावण्यास सांगितल्याचा दावा ईडीने केला आहे. मात्र जी रक्कम वापरुन ही बोली लावण्यास सांगण्यात आलं ती रक्कम वास्तविकपणे बारामती ॲग्रोला खेळते भांडवल म्हणून कर्ज रुपाने मंजूर करण्यात आली होती. या खरेदी प्रकरणामध्ये बारामतीने ॲग्रो कंपनीने कर्जापोटी मिळालेली रक्कम दुसऱ्याच कारणासाठी वापरल्याचा, ईडीचा दावा आहे.

हेही वाचा :  बूब टेप कोणत्या फॅशनेबल कपड्यांसाठी आहे योग्य? काय आहे ही फॅशन

रोहित पवार कनेक्शन काय?

ईडीच्या या संपूर्ण दाव्याचा इशारा बारामती ॲग्रोचे कार्यकारी व्यवस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे आहे. वरिष्ठ व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरील गैरप्रकार होणं शक्य नाही, असा ईडीचा दावा आहे.

ईडीने न्यायालयात काय सांगितलं

“कन्नड सहकारी साखर कारखान्याने एमएससी बँकेकडून कर्ज घेतले आहे. एमएसईबीने लिलावाद्वारे एसएआरएफएईएसआय कायद्यांतर्गत कन्नड साखर कारखाना लिलावाच्या माध्यमातून सुमारे 50 कोटींना विकला. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2012 मध्ये हा व्यवहार झाला. हा कारखाना अखेर बारामती ॲग्रोने विकत घेतला. बारामती ॲग्रो सोबतच हायटेक इंजिनीअर्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडसहीत इतर 2 कंपन्या लिलावाच्या बोली प्रक्रियेत होत्या. लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या हायटेक इंजिनिअर्स कंपनीच्या बँक खात्यांच्या तपासणीमध्ये असे आढळून आले की, 25 ऑगस्ट 2012 रोजी हायटेक इंजिनीअर्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडला बारामती ऍग्रो लिमीटेडकडून 5 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर 2 दिवसांनी ‘हायटेक’ने कन्नड साखर कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत बोली लावण्यासाठी अनामत रक्कम भरण्याकरिता या रकमेचा वापर केला. या साऱ्या व्यवहाराची माहिती चौकशीत समोर आली”, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये दिली आहे.

हेही वाचा :  फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास फक्त या टिप्स वापरा, फोन लगेच मिळेल

हा गैरव्यवहार कारण…

“हायटेक इंजिनीअर्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड ही कंपनीत दिवाळखोरीत निघालेली आहे. या कंपनीच्या खात्यात बारामती ॲग्रोने आपल्या कॅश क्रेडिट अकाउंटमधून 5 कोटी वळते केले होते. प्रथमदर्शनी हा गैरव्यहार आहे, कारण बारामती ॲग्रोला ही रक्कम खेळते भांडवल म्हणून मंजूर झालेली होती,” असंही ‘ईडी’ने म्हटलं आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचा ईडीच्या उलट दावा

मात्र, बारामती ॲग्रोच्या याच व्यवहारासंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ईडीच्या अगदी उलट दावा केला. आर्थिक गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, हायटेक इंजिनीअर्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड ही कंपनी बारामती ॲग्रोची व्हेंडर आहे. तिच्या थकबाकीपोटी बारामती ॲग्राने सदर रक्कम देऊ केली होती. आर्थिक गुन्हे शाखादेखील एमएससी बँकेच्या संदर्भातील कथित 25000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करत आहे. या प्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही चौकशी होणार असल्याची चर्चा 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी रंगली होती. त्यावेळी खुद्द पवारच मुंबईतील ‘ईडी’ कार्यालयात गेले होते. त्यांच्यासोबत पक्षाचे हजारो समर्थक होते. पवारांच्या या खेळीने ‘ईडी’ चे अधिकारी हैराण झाले होते. यावेळीही मोठा फौजफाटा ‘ईडी’ कार्यलयाबाहेर तैनात करण्यात आलेला.

हेही वाचा :  'सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायर्टमेंटचे वय वाढवल्यास नव्या बेरोजगारांना संधी मिळणार नाही'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …