Success Story: आई शेतात तर वडील बेडला खिळून, अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी

Success Story: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या गट ब मुख्य सेवा परीक्षेत अमरावती येथील हर्षल गोवर्धन मुंद्रे या विद्यार्थ्यांने आपल्या प्रतिकूल परिस्थितीत मात करत घवघवीत यश मिळून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

तीवसा तालुक्यात अनकवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गोवर्धन मुद्रे यांचा मुलगा हर्षल यांनी या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीला मात करत यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरी जेमतेम शेती त्यातही वडील आजारी असल्याने घरचा सर्व भार हा हर्षलची आई वंदना मुंद्रे यांच्यावर होता. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊन भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न हर्षल पाहत होता. अमरावती शहरातील एका वाचनालयात मागील काही वर्षांपासून सातत्याने अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देत आहे.

नुकताच लागलेल्या लोकसेवा आयोगाच्या परिस्थितीत हर्षल यांनी घवघवीत यश संपादन करत सेल टॅक्स इन्स्पेक्टर हे पद मिळवले आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं की महागडे क्लासेस, नोट्स इम्पोर्टेड बुक्स या बाबी आल्याच पण हर्षल मात्र त्याला अपवाद ठरला हर्षलने आतापर्यंत कुठलेही क्लास न लावता समाज माध्यम आणि इंटरनेट याचा सकारात्मक उपयोग करत आपल्या ज्ञानात भर घालत यशाचा मार्ग सुकर केला आहे.

हेही वाचा :  PET Exam: क्लिष्ट प्रश्नांमुळे 'पेट'ने फोडला घाम

पालघरच्या आरोग्य विभागात पदभरती, जाणून घ्या तपशील
यावेळी महाराष्ट्र टाइम्स शी बोलताना हर्षल मुंद्रेने सांगितले, माझी राज्य कर निरिक्षक या पदी निवड झाली. २०१५ पासून एमपीएससीचा अभ्यास करत होतो. एसटीआय ही परिक्षा ५ वेळा एएसओ ही परिक्षा २ वेळा आणि राजसेवा मुख्य परिक्षेत ३ वेळा अपयश आले. मात्र मी संयम सोडला नाही. जिद्द चिकाटी आणि स्वतःवर विश्वास असल्याने मी सतत अभ्यास करत गेलो. आयोगाने परीक्षेत रचनेत केलेला बदल प्रश्न विचारण्याची पद्धती वेळेचे नियोजन असा चिकित्सक अभ्यास करत मी या परीक्षेतून यशापर्यंत पोहोचलो.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांचा स्वतःवर विश्वास असेल आणि मेहनत करण्याची जिद्द असेल आणि संयम ठेवला तर यश नक्कीच मिळेल. या क्षेत्रात अनिश्चीतता असली तरी ही संधी मात्र वारंवार मिळते. त्या संधीचे सोन करणे हे आपल्या हातात असते. आत्मविश्वास+जिद्द +मेहनत् + संयम ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्याने सांगितले.

राज्यात तिसरी ते आठवीपर्यंत होणार परीक्षा, आता शिक्षणाचा ‘केरळ पॅटर्न’ राबवणार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …