यूजीसी नेट २०२१ ची परीक्षा ८१ विषयांसाठी घेण्यात आली होती. यूजीसी नेटची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर पुढील स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहताा येणार आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.
UGC NET Result 2021: असा पाहा निकाल
स्टेप १: अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.
स्टेप २: यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३: अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
स्टेप ४: तुमच्या विषयाच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ५: निकाल डाउनलोड करा.
स्टेप ६: निकालाची प्रिंट काढा.
यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ सत्र परीक्षा एनटीएने करोना प्रादुर्भावामुळे उशिरा आयोजित केल्या होत्या. एजन्सीने २० नोव्हेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ या कालावधीत दोन्ही सत्रांच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेतल्या होत्या.
एनटीएकडून मिळेल प्रमाणपत्र
परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना राष्ट्रीय पात्रता चाचणी प्रमाणपत्र जारी केले जाईल. उमेदवार विविध ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) किंवा विद्यापीठे किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त पदांसाठी त्यांच्या संबंधित विषयातील यूजीसी नेट प्रमाणपत्राद्वारे अर्ज करू शकतील.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

