विमानतळावरच समंथाचा ‘Halamithi Habibo’ गाण्यावर ठेका! सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!

Samantha Ruth Prabhu : ‘द फॅमिली मॅन 2’द्वारे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याने समंथा चर्चेत आली होती. तेव्हापासून, चाहत्यांची नजर सतत समंथाच्या प्रत्येक हालचालीवर असते. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटात समंथाने एक खास गाणे केले होते. तिचे ‘ऊ अंटवा’ हे गाणे सुपरहिट झाले आणि सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. समंथाच्या या हिट नंबरवर लोक अजूनही सतत रील्स बनवताना दिसतात. तिच्या या गाण्यानंतर आता नुकतेच सामंथा रुथ प्रभूचे आणखी एक गाणे इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे.

समंथा रुथ प्रभूने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती विमानतळावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एअरपोर्टवर ग्रे क्रॉप टॉप, ब्लॅक रिप्ड जीन्स आणि ब्लू डेनिम जॅकेटमध्ये दिसत आहे. दक्षिणेतील सुपरस्टार थलपती विजय आणि पूजा हेगडे यांच्या अलीकडेच रिलीज झालेल्या ‘हलामिथी हबीबो’ या गाण्यावर ती तिच्या डान्सकहा जलवा दाखवत आहे. चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.

हेही वाचा :  सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं... | ankita lokhande seen raging on her husband vicky jain in holi party calm her down video going viral

पाहा व्हिडीओ :

समंथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. युजर्स तिच्या डान्सची तुलना पूजा हेगडेच्या डान्सशी करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तू पूजा हेगडेपेक्षा चांगला डान्स केला आहेस’. तिच्या डान्स व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 22 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर समंथा चर्चेत

समंथा रुथ प्रभू हिने 2017मध्ये नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली होती. ‘ये माया चेसवे’च्या दरम्यान नागा आणि समंथा प्रेमात पडले, त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, तीन वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर घटस्फोटाच्या बातम्या येत असताना सामंथाने तिचे आडनाव बदलले. मात्र, नंतर दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर आपण विभक्त झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …