धक्कादायक! शिक्षिकेची १०१ वेळा चाकूने भोसकून हत्या; ३० वर्षांपूर्वीचं कारण ठरलं निमित्त; पोलीसही चक्रावले | Ex Student Stabs Teacher 101 Times,30 Years After Humiliation At Belgium School sgy 87


आरोपी १६ महिन्यांनी लागला पोलिसांच्या हाती, मित्राला सांगणं पडलं महागात

शिक्षिकेने तीन दशकांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हत्या करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. ३७ वर्षीय आरोपीने या हत्येची कबुली दिली आहे. २०२० मध्ये या व्यक्तीने प्राथमिक शाळेत आपली शिक्षिका राहिलेल्या महिलेची हत्या केली होती. बेल्जियममध्ये ही घटना घडली असून गुरुवारी सरकारी वकिलांनी याची माहिती दिली.

Gunter Uwents असं या आरोपीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका मारिया व्हर्लिंडेन यांनी १९९० मध्ये आपल्यावर केलेली कमेंट विसरु शकलो नव्हतो. त्यावेळी आपण फक्त सात वर्षांचे होतो.

२०२० मध्ये ५९ वर्षीय मारिया यांची त्यांच्या घऱात हत्या झाली होती. बेल्जियम पोलिसांनी हजारो लोकांचे डीएनए नमुने घेत तपास केल्यानंतरही हत्येचा उलगडा होत नव्हता. मारिया यांच्या पतीने लोकांना साक्षीदार असल्याच पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. पण काही केल्या हल्लेखोराचा शोध लागत नव्हता.

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, १०१ वेळा भोसकून मारिया यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पाकिटात असणाऱ्या पैशांना हात लावला नसल्याने चोरीच्या उद्धेशाने हत्या झाली नसल्याचं स्पष्ट होतं.

हेही वाचा :  बेपत्ता विद्यार्थिनी, नग्न मृतदेह, बलात्कार अन् संशयिताची ट्रेनसमोर आत्महत्या; मुंबईतील हॉस्टेलमध्ये धक्कादायक घटनाक्रम

हत्येच्या १६ महिन्यांनी २० नोव्हेंबरला आरोपीने आपल्या मित्राला हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली. अखेर रविवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या डीएनए नमुन्यांची आणि आरोपीच्या नमुन्यांची तपासणी केली आहे.

आरोपीने हत्येची कबुली दिली असून सविस्तर माहिती सांगितल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे. प्राथमिक शाळेत असताना शिक्षिकेमुळे आपल्याला खूप सहन करावं लागलं असं त्याचं म्हणणं आहे. तपासादरम्यान याची चाचपणी केली जाईल असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं. यानंतर त्याला कस्टडीत पाठवण्यात आलं आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …