Snake Video : जेव्हा 8 फुटाचा शक्तिशाली अजगर बकरी गिळतो…; धक्कादायक व्हिडीओ Viral

Snake Viral Video : प्रशांत परदेशी, धुळे : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. अशात शेतकरी हातातोंडाशी आलेलं पिक गमावल्यामुळे हैराण झाले आहेत. घराची, दुकानांची अवस्था दैननीय झाली आहे. प्राण्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. साप अजगर रस्ते आणि घरांमध्ये दिसून येतं आहेत. 

एका महाकाय आठ फुटाच्या शक्तिशाली अजगराने एक बकरीची शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही दृश्यं विचलित करणारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अजगराने एका बेकरीला फस्त केल्यानंतर तो दुसऱ्या बेकरीला गिळत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अजगराचं पोट फुगलेलं दिसतंय. या 8 फूट अजगराने संपूर्ण बेकरी गिळल्यानंतर तो दुसऱ्या बेकरीचा शिकार करण्याचा तयारी होता. 

हा धक्कादायक व्हिडीओ महाराष्ट्रातील धुळे शहरातील आहे. धुळे शहरातील नकाने तलाव परिसरातमध्ये हा अजगर आढळून आला. त्या परिसरातील जिमखाना जवळ अजगर बेकरीची शिकार करताना स्थानिकांनी दिसला. (trending Snake Viral Video python swallows whole goat videos in Maharashtra Dhule)

या घटनेची माहिती स्थानिकांनी ताबडतोब सर्पमित्रांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोटात बकरी असल्याने अजगराला हालचाल करणं कठीण झालं होतं. दरम्यान सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षित ठिकाणी सोडलं. 
 
दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका अकोला जिल्ह्यायीतल मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसोमधील कुक्कुटपालन केंद्रालाही बसलाय. या केंद्रातील हजारो कोंबड्या मृत्यूमुखी झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे 7 ते 8 लाखांचे नुकसान झाले आहेत. 

हेही वाचा :  बाप-लेकीचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, लोकांना संताप अनावर

पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले प्लॅस्टिक पडदे वादळाने उडून गेल्याने सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं. त्यांना देणार येणारं खाद्यसुद्धा पाण्याने भिजलं. त्यामुळे पाच हजार पक्ष्यांमधील तीन हजारांच्यावर कोंबड्यांचा थंडीने कुडकुडून मृत्यू झालाय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …