दहावी-बारावीची परीक्षा खुल्या पुस्तकात पाहून देता येणार? बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, ‘येत्या वर्षात…’

Open Book Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परीक्षेचा अभ्यास न झालेले काहीजण बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी कुठेतरी लिहून किंवा थेट पुस्तकाची पाने आणून, विविध प्रकारे कॉपी केली जाते. पण परीक्षा देताना पुस्तक खुले ठेवून उत्तरे लिहिता आली तर? हो. हे शक्य होऊ शकते. कारण महाराष्ट्र बोर्डाने यासंदर्भातील संकेत दिले आहेत. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी खुले पुस्तक परीक्षेसंदर्भात सूचक विधान केले आहे. सीबीएसई परीक्षेच्या धर्तीवर महाराष्ट्र बोर्डामध्ये खुले पुस्तक परिक्षेसंदर्भात पायलट प्रोजेक्ट केला जाईल, अशा आशयाचे विधान त्यांनी केले. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विद्यार्थ्यांमधील विश्लेषणात्मक कौशल्ये वाढवणे आणि घोकंपट्टीपासून त्यांचा बाचव करणे, असे या पॅटर्नचे फायदे आहेत. यावर चर्चा झाली. असे असले तरी अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिली. 

ठोस निर्णय नाही

बोर्ड आता विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा पॅटर्न लागू करु शकते, अशी माहिती यापूर्वी 29 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली होती.  यानंतर चर्चेला सुरुवात झाली. दरम्यान ओपन बुक एक्झाम पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे का?  याची खात्री केली जाणार आहे. संपूर्ण चाचणी आणि मूल्यमापन झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. सध्या या विषयावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचा :  महिलेने मुलासह तीन वर्ष सूर्यच पाहिला नाही, कारण जाणून आश्चर्य वाटेल

‘पद्धत उपयुक्त ठरू शकते’

आम्ही इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या पुस्तक परीक्षा घेण्याच्या (OBE) विचारात आहोत. परीक्षा पद्धतीच्या अंमलबजावणीबाबत विद्यार्थी तसेच शिक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहिले जाईल. त्याआधारे निर्णय घेतला जाईल, असे गोसावी म्हणाले. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना आणि सूत्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संमिश्र प्रतिक्रिया

असे असले तरी या उपक्रमावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचे कौतुक केले आहे. तर  खुल्या पुस्तक परीक्षेचा निर्णय कसा राबवला जाईल याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …