केस न कापण्याच्या शिझानच्या मागणीवर जेल अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Tunisha Sharma Case: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्माहत्या प्रकरणाला रोज नवं वळण येत आहे. या प्रकरणी अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली आहे. शिझानची बहिण आणि त्याच्या आईनं तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप करुन काही धक्कादायक खुलासे केले. आता अभिनेता शिजान खानला (Sheezan Khan) अंडरट्रायल कैद्यांशी संबंधित तुरुंगातील नियमांचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

तुनिषा शर्माला आत्महत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून  शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी वसई सत्र न्यायालयाला अशी विनंती केली की, शिझानचे केस तुरुंगात  कापू नयेत, जेणेकरून तो मालिकेचे शूटिंग सुरू ठेवू शकेल. यानंतर ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, अंडरट्रायल कैद्यांशी संबंधित कारागृहाचे नियम शिझानला पाळावे लागतील. 

तुरुंग अधिकाऱ्यांच्या मते, फक्त शिख समुदायाचे कैदीच लांब केस ठेवू शकतात, तर हिंदूंना शेंडी आणि मुस्लिमांना दाढी ठेवण्याची परवानगी आहे.  शिझानला तुरुंगाच्या नियमावलीनुसारच जेवण दिले जाईल, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिझानच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन केले जाईल आणि डॉक्टरांच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल. या संदर्भात शिझानच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली होती. 

हेही वाचा :  'या दिवसानं माझं आयुष्य बदललं...'; प्रथमेश परबनं शेअर केली खास पोस्ट

 शिझान खानच्या जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज

live reels News Reels

 तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईनं वालीव पोलीस स्थानकात केली आहे. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे.  वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला आहे.  

तुनिषा शर्माने ‘भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप’ (Bharat Ka Veer Putra : Maharana Pratap), ‘इंटरनेट वाला लव’ (Internet Wala Love), ‘अलीबाबा : दास्ताने ए कुबुल’ (Ali Baba : Dastaan – E – Kabul) आणि ‘इश्क सुभान अल्लाह’ (Ishq Subhan Allah) अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. तुनिषा सोशल मीडियावर देखील सक्रिय होती. ती विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत होती.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा प्रकरणी शिझान खानच्या जामिनासाठी वसई न्यायालयात अर्ज

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …