Tag Archives: maharashtra news

म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती, काय आहे पात्रता? जाणून घ्या.

MIL Job: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुण्यात  म्युनिशन्स इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती सुरु असून येथे तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  म्युनिशन्स इंडिया …

Read More »

4 कोट्यधीश, 2 अब्जाधीश; एकाची संपत्ती तर तब्बल 450 कोटी! पाहा, राज्यसभेच्या सर्व उमेदवारांची नेटवर्थ

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहा जागांसाठी बिनविरोध निवडणूक होत आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे. एक अपक्षासह सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, शिंदेसेनेकडून मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री चंदक्रांत हंडोरे यांनी राज्यसभेसाठी …

Read More »

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कृत्यात काही जण सहभागी होत असल्याची माहिती मिळताच एनआयएच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीवरून छत्रपती संभाजीगनर शहरात नऊ ठिकाणी एनआयएच्या पथकाने छापे मारले. या छाप्यात एनआयएच्या हाताला महत्त्वाची व्यक्ती हाती लागली आहे. त्याच्या घरातून अनेक आक्षेपार्ह इलेक्ट्रॉनिक गॅझेट, तसेच गुन्हेगारीशी संबंधित …

Read More »

कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ… भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची …

Read More »

बापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि…; पिंपरीमध्ये एकच खळबळ

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम चालू असलेली इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचा प्रकार समोर झाला आहे. मंगळवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. हा सगळा प्रकार समजताच आजूबाजूचे लोक परिसरात जमा झाले होते. इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांची चांगलीच धावळप उडाली. या घटनेची दाखल तातडीने घेऊन अग्निशामक दलाल आणि पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर इमारतीला तात्पुरता आधार …

Read More »

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Maharashtra Politics : शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राज्यात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार मोठं पाऊल उलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्ष काँगेसमध्ये विलीन होऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र शरद पवार गटाकडून याविषयी कोणताही दुजोरा दिलेला नाही. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी …

Read More »

मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील वारंवार वैद्यकीय उपचारास नकार देत असल्याने सरकारसमोर देखील मोठं आव्हान …

Read More »

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी ‘हात’ झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Ashok Chavan joined BJP : अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन नाना पटोले यांनी गांधी भवन येथे काँग्रेसच्या बैठकीनंतर केलं. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा सेटबॅक बसलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली …

Read More »

बदलापूर ते पनवेल फक्त 15 मिनिटात; माथेरानच्या पर्वतरांगातून जाणार बोगदा

JNPT HIGHWAY BADLAPUR TUNNEL : बदलापूर ते पनवेल अंतर अवघ्या 15 मिनीटात पार करता येणार आहे. जेएनपीटी वडोदरा महामार्गातील बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे.   माथेरानच्या पर्वतरांगामधून जाणाऱ्या या बोगद्याचे काम  2025 ला पूर्ण होणार आहे. यामुळे बदलापूर आणि पनवेलकराचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.   बदलापूर शहरातून जाणाऱ्या जेएनपीटी वडोदरा या महामार्गात येणाऱ्या बोगद्याचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. माथेरानच्या पर्वतरांगातून जाणाऱ्या …

Read More »

न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार

Pune Crime: पोलीस चौकीसमोरच तरुमाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. न्याय मिळत नसल्याने तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  रोहिदास अशोक जाधव असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो 28 वर्षांचा आहे. रोहिदास हा वाघोलीच्य डोमखेल रोडवरी रा. सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहतो. काही कारणामुळे …

Read More »

कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या …

Read More »

‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी

Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टिका केली. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत, असा …

Read More »

Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात…

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: एखाद्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी गेल्यावर आयुष्यात खूप काही मिळवल्याची अनेकांची भावना असते. पण करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना देखील दुसरे आवडीचे क्षेत्र निवडणे, त्यासाठी मेहनत करणे आणि त्यातील महत्वाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे, हे फार कमी जणांना जमते. ऐश्वर्या शेरॉन हे नाव त्यातीलच एक आहे. ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण …

Read More »

‘जबाबदारी आहे त्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांत राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला. मुंबईत मॉरिस नावाच्या व्यक्तीने ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर आता चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष …

Read More »

बाळासाहेब ठाकरेनीं चित्रपटातही केलं होतं काम! मनसेकडून ‘तो’ दुर्मिळ सीन शेअर

देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख हे बहुआयामी व्यक्तीमत्व होतं. कला आणि कलाकाराची जाण असलेले, उत्तम वक्ता, कार्टुनिस्ट, हिंदू नेता अशी अनेक बिरुद त्यांच्या नावाआधी लावली गेली. याच बाळासाहेबांनी चित्रपटात काम केलंय, असं कोणी सांगितलं तर आपल्याला नवलं वाटेल. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा चित्रपटाशी कसा संबंध आला याच्या …

Read More »

Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

Success Story: जगामध्ये लाखो लोकं आयुष्यात यशस्वी होण्याची स्वप्न पाहतात. पण खूप कमीजणचं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की आपण आयुष्यात यशस्वी झालो असे अनेकांना वाटते. पण आपल्याला आवडीचे काम करायला मिळणे हे खरे समाधान असल्याचे बंगळूरच्या एका तरुणाला वाटू लागले. मग काय? त्याने बॅंकेच्या नोकरीला राम राम केला आणि छोट्या …

Read More »

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात पदवीधरांना नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

MSAMB Job 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांमध्ये भरती करण्यात येत असते. पण योग्यवेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती न पोहोचल्याने हजारो तरुण नोकरीपासून वंचित राहतात.  राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.  एमएमएएमबी अंतर्गत विधी अधिकारी आणि सहायक विधी अधिकारी पदांच्या एकूण …

Read More »

अंगणवाडीत नोकरी देतो म्हणून बोलावलं, जेवणात नशेचं औषध टाकून 20 महिलांवर सामूहिक बलात्कार!

Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. नोकरी हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. याचाच फायदा घेत नोकरीच्या बहाण्याने महिलांवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 20 महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. सिरोही नगरचे सभापती, माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी हे गैरकृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.  नोकरी …

Read More »

‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; 9 मागण्यांसाठी मनोज जरांगेंचे तिसऱ्यांदा उपोषण सुरु

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. येत्या 15 फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. …

Read More »

Nikhil Wagle Attack : पुण्यातील घटनेवरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘वागळेंनी नीट बोलावं कारण…’

Nikhil Wagle Attack : पुण्यातल्या निर्भय बनो सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. निर्भय बनो सभेसाठी आलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी भाजप कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली. तसेच त्यांच्या गाडीवर शाई, अंडी फेकण्यात आली. ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता. या हल्ल्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया …

Read More »