पॉर्न पाहून पती व्हायचा हैवान; नशेची गोळी देऊन बंद खोलीत…’ अंगावर शहारा आणणारी घटना

UP Crime: देशात विशेषत: घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही घटनांची पोलीस नोंद होते. पण पोलीस नोंद न होणाऱ्या, जगासमोर न येणाऱ्या घटनांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असते. अशा अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. समाज इभ्रतीमुळे त्यांच्याकडून घटनांची वच्चता केली जात नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. तरुणाचे भूलथापांना पुजाऱ्याची मुलगी सुरुवातील भुलली. तिला अनेकांनी समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध केला पण त्याने तिच्याशी बळजबरीने लग्न केल्याचे सांगण्यात येते. पण यापुढे जे घटले ते मानवतेला शोभा देणारे नव्हते.  

लग्नानंतर तरुणाने क्रौर्याची परिसीमा ओलांडली. त्याच्या आतील राक्षस जागा झाला. नको ते कृत्य तो आपल्या पत्नीसोबत करु लागला. रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसएसपींच्या आदेशानुसार बारादरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी संजय नगर येथे राहत असून ती ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. पार्लरमध्ये जात असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली. तो तरुण संभल जिल्ह्यातील बाबराला येथील रहिवासी होता. यश देवल असे या तरुणाचे नाव आहे. यश हा संतापी, वाईट नादाला लागलेला तरुण. यशचा जीव पीडित तरुणीवर जडला. त्याने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी कारण सांगून त्याने मैत्री केली. पुढे काही दिवसातच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

हेही वाचा :  यंदा थंडीच पडेना! 147 वर्षांचा रेकॉर्ड तुटणार? राज्यातील हवामान कसे असेल

अश्लील फोटोने ब्लॅकमेलिंग

प्रेमाच्या नादात यशने प्रेमाच्या सीमा ओलांडल्या. यशने याचा गैरफायदा घेतला.त्याने प्रेमाच्या बहाण्याने तरुणीचे अश्लील फोटो काढले. तरुणीला फार उशीरा जाग आली. आता यश फोटोच्या माध्यमातून तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकू लागला होता. हळुहळू तो मुलीकडे विचित्र मागण्या करु लागला. त्याच्यासाठी पीडित तरुणीने घरात ठेवलेले दागिने आणि पैसे काढून यशला दिले. या सुरु झालेल्या खेळात यश एकटाच नव्हता. त्याचे मित्र त्याला साथ देत होते. आता यश आणि त्याच्या साथीदारांनी मुलीला ओलीस ठेवले.  तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर तरुणी अधिकच खचली. आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे तिला वाटू लागले.  सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आपण यशसोबत कोर्ट मॅरेज केल्याचे पीडित तरुणी सांगते. 

पॉर्न पाहून अत्याचार

यश पीडित तरुणीला घेऊन दिल्लीला गेला. तेथे एक खोली भाड्याने घेऊन तो तिच्यासोबत राहू लागला. त्याने तरुणीला नशेचे अमली पदार्थ द्यायला सुरुवात केली. यशला सतत पॉर्न चित्रपट पाहण्याची सवय होती. पॉर्न चित्रपट पाहून यश पीडितेवर अत्याचार करत असे. अनेकदा तो तरुणीला खोलीत बंद करुन बाहेर निघून जात असे. 

हेही वाचा :  Pune Metro: पुणेरी आजोबानंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral | Funny video of mother in pune Metro goes viral after puneri ajoba

सासरच्यांकडूनही दबाव

या सर्व दलदलीतून बाहेर पडण्याचा विचार तरुणी करु लागली. पण यशची करडी नजर तिच्यावर सारखी असायची त्यामुळे तिच्यासाठी ते सोपे नव्हते. मला घरी जायचे आहे, इथून सोड असे ती वारंवार सांगत होती. अखेरीसएके दिवशी मुलीने जास्तच गोंधळ घातला तेव्हा यश तिला घेऊन बाबराळा येथील स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथेही तिला सुखी जिवन अनुभवता आले नाही. कारण सासू सुनीता, सासरा अनिल देवल, वहिनी आंचल देवल यांनी बाबराला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीकडे सासरची मंडळी आलिशान कार आणि 5 लाखांची मागणी करू लागल्याचा आरोप पिडितेने केला आहे. 

जिवंत जाळण्याची धमकी

माहेरुन पैस न आणल्यास जिवंत जाळण्याची धमकी सासरच्यांनी तरुणीला दिली. एके दिवशी यश देवल आणि त्याच्या कुटुंबीयांनी हद्दच पार केली. त्यांनी पिडित मुलीला मारहाण केली आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. जोरजोराने आरडाओरडा केला. च्यानंतर सासरच्यांनी मुलीला घराबाहेर हाकलून दिले. 

आक्षेपार्ह पोस्ट

पीडित तरुणीने आपल्या माहेरच्यांना सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर सर्वांनी पोलीस ठाणे गाठले. आता तरुणी तिच्या माहेरच्या घरी राहत होती. असे असतानाही यश अजूनही सोशल मीडियावर तिच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करत  असल्याची तक्रार पीडितेने केली. यानंतर एसएसपींच्या आदेशानुसार बारादरी पोलिस ठाण्यात यश आणि त्याच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचा :  'राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..'; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का

Big News For Bank Customer: भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation …

अण्वस्त्रसज्ज चीननं वाढवली जगाची चिंता; पाकिस्तानही दहशतीच्या छायेखाली, भारतात काय चित्र?

SIPRI report : भारतीय सीमाभागात एकिकडे पाकव्याप्त (POK) काश्मीरमधून (Kashmir) सातत्यानं देशात घुसखोरीचा प्रयत्न केला …