कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरांचा आज शिंदे गटात पक्षप्रवेश?

Former Congress MP Milind Deora: लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगावू लागले आहेत. अशावेळी सर्वच राजयकी पक्ष आणि त्यांचे संभाव्य उमेदवार आपले खुंटे बळकट करण्याच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी सुरक्षित मतदार संघ आणि प्रत्येक पक्ष आपल्यासाठी भक्कम उमेदवाराच्या शोधात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा हे आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. देवरा काँग्रेसमध्ये नाराज असून ते काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा आहे.दक्षिण मुंबई लोकसभा जागा कोणाची यावरुन ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढलेयत.यात ही जागा ठाकरे गट लढणार असल्याने मिलिंद देवरांनी नाराजी व्यक्त केली.त्यामुळे देवरा आज शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यास दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे. 

देवरा कुटुंबाचे गांधी परिवाराशी निकटचे संबध आहेत. पण दक्षिण मुंबईतील राजकीय परिस्थिती देवरा यांच्या फायद्याची दिसत नाही. येथे त्यांना अरविंद सावंत यांचे आव्हान आहे. अशावेळी ते शिंदे गटात जाऊन आपली जागा बळकट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दरम्यान कॉंग्रेस हायकमांड देवरा यांची नाराजी दूर करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :  पक्ष फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल! बंडखोरीनंतरच्या पहिल्या भाषणात पवारांचा हल्लाबोल

दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्यासाठी भाजपाकडून कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे इच्छुक असल्याचे म्हटले जाते. मिलींद देवरांनी दक्षिण मुंबईतून शिंदे सेनेकडून निवडणूक लढवली तर या नेत्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागू शकते. 

कोण आहेत मिलिंद देवरा? 

मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय राज्य मंत्री असून दक्षिण मुंबई येथून कॉंग्रेसचे माजी खासदार आहेत. मिलींद देवरा यांचे वडिल मुरली देवरा हे केंद्रीय मंत्री राहीले होते. तसेच मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष देखील होते. देवरा परिवार आणि गांधी परिवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. मिलींद देवरा देखील राहुल गांधी यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. 

देवरा परिवार यांचा देशातील उद्सोजक मुकेश अंबानी यासह अनेक उद्योजक यांची मैत्री ही कायम चर्चे्चा विषय राहिला आहे. मिलींद देवरा यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाल्यास दक्षिण मुंबई लोकसभा शिंदे गट लढवणार का ? मिलींद देवरा विरूद्ध अरविंद सावंत अशी शिवसेनेतच दोन उमेदवार एकमेकांच्या समोर असणार का? याकडे लक्ष लागले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …