नागपुरात रिमोटचा वापर करुन उद्योजकांनी चोरली वीज; सात जणांवर गुन्हा दाखल

Nagpur News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने (महावितरण) नागपुरात मोठी कारवाई केली आहे. नागपुरात महावितरण आणि लष्करीबाग उपविभागाच्या भरारी पथकाने संयुक्तपणे मोहीम राबवून सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याची समोर आणलं आहे. या सात उद्योगपतींनी तब्बल 52.55 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आलं आहे. नारी आणि कामठी रोड परिसरातील सात उद्योजकांनी तब्बल 3 लाख 14 हजार 753 युनिटची वीज चोरी केली आहे. त्यानंतर चार औद्योगिक ग्राहकांनी सेटलमेंट म्हणून 10.60 लाख रुपये दिले आहेत.

सातही ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर शहर व नागपूर ग्रामीण विभागाचे भरारी पथक आणि महावितरणच्या लार्शीबाग उपविभागातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी केलेल्या या धडक कारवाईत नारी व कांप्टी परिसरातील सात ग्राहकांकडून तब्बल 3.14 लाख युनिट वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे. या कारवाईमुळे औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरीची धास्ती घेतली आहे.

या चोरीची अंदाजे किंमत सुमारे 52.55 लाख रुपये असून या सात ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सातपैकी सहा प्रकरणांमध्ये दुसऱ्या ग्राहकाकडून येणार्‍या केबलला टॅप करून मीटरला बायपास करण्यात आले होते. तर एका प्रकरणात रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीज ट्रीप केली जात असल्याचे समोर आलं आहे. या सातही वीज ग्राहकांकडून 52.55 लाख रुपये अधिक 20.90 लाख रुपये वीजचोरीसाठी दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी चार ग्राहकांनी वीजचोरीसाठी 18.25 लाख रुपये आणि थकबाकीची पूर्तता म्हणून 10.60 लाख रुपये भरले आहेत.

हेही वाचा :  10वी 12वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागणार निकाल?

ही कारवाई महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) सुनील थापेकर, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर, श्रीकांत तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

दरम्यान वीजचोरी टाळण्यासाठी महावितरणतर्फे वीजचोरी कळवा, 10 टक्के बक्षीस मिळवा असा उपक्रम राबण्यात आला आहे. वीजचोरीच्या प्रकारास आळा घालण्यासाठी महावितरणने वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा हा उपक्रम जाहीर केला होता. यामध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपुर्वक फेरफार करून होणाऱ्या वीजचोऱ्या रोखण्यासाठी महावितरणने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे नागरिकांनी या पुढे येऊन वीजचोरीची माहिती कळवावी, असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …