CIET awards: जिल्हा परीषदेच्या सहा शिक्षकांना मिळणार ICT पुरस्कार

ICT awards:केंद्र सरकारच्या (Central Government)सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीकडून (Central Institute of Educational Technology, CIET) शिक्षकांसाठीचे राष्ट्रीय पातळीवरील आयसीटी पुरस्काराचे (ICT Awards) वितरण २८ फेब्रुवारी २०२२ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांचे पुरस्कार यावेळी दिले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील (Maharashtra Zilla Parishad School) सहा शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान होत आहे.

एनसीआरटी (NCRT) नवी दिल्ली यांच्या वतीने देशातील शिक्षकांना विविध शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. २०१८ आणि २०१९ यावर्षीचे हे आयसीटी पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. संपूर्ण देशातील २८ राज्ये आणि केंद्रशाशीत प्रदेश यांच्यातील २०५ शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून राज्यातील ६ शिक्षकांना हा आयसीटी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करणाऱ्या शिक्षकांना आयसीटी पुरस्कार देण्यात येतात. २०१८ साठी देशभरातील २५ शिक्षकांची, २०१९ साठी देशभरातील २४ शिक्षकांची निवड करण्यात आली. राज्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये २०१८ साठीच्या ICT पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे…

हेही वाचा :  भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा [ARO कोल्हापूर]

१) नागनाथ शंकर विभूते – पुणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभूळदरा
ता.खेड जि. पुणे

२) आनंद बालाजी अनेमवाड-पालघर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मल्याण मराठी, डहाणू
ता. डहाणू जि. पालघर

३) उमेश रघुनाथ खोसे-उस्मानाबाद
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर, कडदोरा
ता. उमरगा जि. उस्मानाबाद

Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज

TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या
२०१९ साठीचे पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे….

१) मृणाल नंदकिशोर गांजळे-पुणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे
ता. अंबेगाव जि. पुणे

२) प्रकाश लोटन चव्हाण-नाशिक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजवण
ता. दिंडोरी जि. नाशिक

३) शफी अजीज शेख – यवतमाळ
जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा बिटरगाव ( बु.)
ता.उमरखेड जि. यवतमाळ

यावेळी उस्मानाबाद उमेश रघुनाथ खोसे यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने आणि राष्ट्रीय आय.सी.टी.पुरस्काराने सन्मान होणार आहे.

सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी आयसीटी पुरस्कारांमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. या शिक्षकांना या सन्मान सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. या सन्मान सोहळ्याचे ऑनलाईन पद्धतीने प्रक्षेपण होणार आहे.

हेही वाचा :  रेल कोच फॅक्टरी अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

Indian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
GAIL India Recruitment 2022: गेल कंपनीत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …