तब्बल 8,091 मीटर उंच अन्नपूर्णा शिखरावरून गिर्यारोहक बेपत्ता; सापडला तेव्हा…

Indian Mountaineer Anurag Maloo: जगातील उंचच उंच शिखरं सर करणारे अनेक गिर्यारोहक (Mountaineer) तुम्ही पाहिले असतील. त्यांच्या प्रवासवर्णनांचा थरारही अनुभवला असेल. किंबहुना तुम्ही चित्रपटांच्या माध्यमातूनही हे गिर्यारोहणाचं क्षेत्र नेमकं कसं असतं याची झलक पाहिली असेल.

मुळात हे सर्वकाही समोरून पाहणं आणि प्रत्यक्षात अनुभवणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण, प्रत्यक्षात हे सारं अनुभवत असताना क्षणात नेमकं काय घडेल याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. बदलणारं हवामान, कठीण चढाई, शरीराची साथ असे अनेक घटक यावेळी महत्त्वाची भूमिका निभावत असतात आणि एखादी लहाशी चूक इथं तुम्हाला संकटाच्या दरीत लोटू शकते. अगदी मृत्यूच्याही दरीत! 

‘त्यानं’ मृत्यू जवळून पाहिला… 

मागील आठवड्यात (Rajasthan) राजस्थानमधील एक व्यावसायिक असणारा 34 वर्षीय अनुराग मालू (Nepal) नेपाळमध्ये असणाऱ्या जगातील सर्वाधिक उंचीच्या शिखरांपैकीच एक अशा अन्नपूर्णा शिखराच्या चढाईसाठी गेला होता. त्याचवेळी कँप 4 वरून कँप 3 पर्यंत येत असताना तिसऱ्या कँपखाली असणाऱ्या एका हिमदरीत तो कोसळला. 

सदरील गिर्यारोहण उपक्रम आयोजन करणाऱ्या संस्थेशी संलग्न एका अधिकाऱ्यानं माध्यमांना याबाबतची माहिती दिली. 8 हजार मीटरहून अधिक उंचीच्या 14 शिखरांवर चढाई करण्याच्या मोहिमेसाठी अनुराग निघाला होता. पण आरईएक्स करम-वीर चक्रनं सन्मानित या गिर्यारोहकाच्या नशिबात मात्र काही वेगळंच लिहिलं होतं. 

हेही वाचा :  Earthquake In Delhi: दिल्ली भूकंपाने हादरली, 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ धक्के

एक अनुभवी गिर्यारोहक असूनही अनुराग अन्नपूर्णा शिखर उतरताना संकटाच्या नव्हे, तर मृत्यूच्या दरीत कोसळला होता. भारतीय शासनापर्यंत ही माहिती पोहोचली आणि त्याचा शोध घेण्याच्या मोहिमेला वेग आला. कुटुंबीय आणि मित्रपरिवार प्रचंड चिंतेत असतानाच तिथं यंत्रणांनी यामध्ये जातीनं लक्ष घातलं आणि इतक्या दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर अनुराग गुरुवारी सापडला, तो श्वास घेत होता. 

‘तो हयात आहे… सध्या त्याची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्याच्यावर तातडीनं उपचार सुरु करण्यात आले आहेत’ अशी माहिती अनुरागच्या भावानं वृत्तसंस्थेला दिली आणि सर्वांच्याच जिवात जीव आला. 

अन्नपूर्णा शिखराविषयी थोडं… 

नेपाळमध्ये असणारं माऊंट अन्नपूर्णा हे जगातील दहाव्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. पर्वतशिखरांची चांगली ओळख असूनही अनेक गिर्यारोहकांसाठी अन्नपूर्णा सर करताना वाटेत बरेच अडथळे येतात. इथं असणारा हवेचा मारा आणि क्षणात बदलणारं हवामान हे आजवर सातत्यानं गिर्यारोहकांच्या मोहिमांमध्ये अडथळे निर्माण करताना दिसलं आहे. 

हेही वाचा :  Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …