कांदा बारीक चिरता येत नाही का? अजिबात घेऊ नका टेन्शन, सोप्या पद्धतीने होईल २ मिनिटात काम

भारतीय पदार्थांमध्ये कांदा हा अविभाज्य पदार्थ आहे. कांद्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होतच नाही. पण अनेकांना कांदा बारीक चिरायला अजिबात जमत नाही. त्यामुळे कांद्याच्या मोठमोठ्या फोडी दिसून येतात. पण काही भाज्यांमध्ये अथवा आमटीमध्ये, कोशिंबीरमध्ये बारीक चिरलेला कांदाच चांगला लागतो. सर्वांनाच ते जमते असं नाही. तुमची पण कांदा बारीक कापण्याची सवय नसेल तर काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या ट्रिक्स वापरून तुम्हालाही बनवता येईल कमी वेळात स्वयंपाक, कांदा चिरायला लागणार नाही जास्त वेळ. चला तर मग जाणून घेऊ. (फोटो सौजन्य – iStock)

​कांदा असा कापावा​

​कांदा असा कापावा​

Onion Cutting Tips: कांदा कापण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की, कांदा ताजा असावा आणि संपूर्णतः कोरडा असावा. कांदा बाहेरून ओलसर लागत असेल तर तुम्ही थोडा वेळ हवेत ठेवावा. त्यानंतरच तो कापायला घ्यावा. असं केल्यामुळे कांदा कापताना तुमची बोटं सरकरणार नाहीत आणि हात कापण्याची भीतीही राहणार नाही.

हेही वाचा :  Cooking Hacks : ओव्हन नसेल तरी पिझ्झा बनवा ; तेही 10 मिनिटात

​कांदा कापताना सर्वात पहिली प्रक्रिया​

​कांदा कापताना सर्वात पहिली प्रक्रिया​

सर्वात पहिल्यांदा कांद्याचा वरचा आणि खालचा भाग चाकूने कापून वेगळा करावा. असं केल्यामुळे कांद्याची सालं काढणे सोपे जाते. घाईच्या वेळेत कांदा सोलणे हे वेळकाढूपणाचे असते. त्यामुळे कांद्याची सालं पटकन काढण्याची ही सोपी ट्रीक आहे.

( वाचा – तळलेल्या पुरीत दिसतंय तेल? ऑईल फ्री पुरी दिसण्यासाठी वापरा कमालीच्या ट्रिक्स)

​चॉपिंग बोर्डावर ग्रिपसह पकडा​

​चॉपिंग बोर्डावर ग्रिपसह पकडा​

कांद्याचे साल काढून झाल्यावर चॉपिंग बोर्डावर कांदा ठेऊन योग्य ग्रिपसह पकडा. बारीक कांदा कापण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही कांदा आडवा कापून घ्या. पण असे करताना तुम्ही कांद्यात नखं रुतवून ठेवा. जेणेकरून कांदा तुमच्या हातातून निसटणार नाही आणि कांदा कापणे सहजसोपे होईल.

(वाचा – पुरणपोळी होतेय का वातड, अशी बनवा मऊसूत पुरणपोळी आणि साजरी करा होळी)

​दोन भाग करा आणि मगच चिरा​

​दोन भाग करा आणि मगच चिरा​

कांदा कापण्यापूर्वी त्याचे दोन भाग करा आणि मगच चिरायला घ्या. यामुळे कांदा बारीक चिरणे अधिक सोपे होईल. आडवा कांदा कापताना त्याचे पूर्ण भाग न करता हलकेसे चिरावे आणि मग तोच आडवा कांदा उभा करून चिरावा. त्यानंतर संपूर्णतः कांदा कापला जाईल असा पुन्हा आडव्या बाजूने चिरल्यास कांदा बारीक कापला जातो.

हेही वाचा :  उद्धव ठाकरे खरे की रश्मी ठाकरे? खरं कोण, चौकशी करा! किरीट सोमय्या यांचा सवाल

(वाचा – नाश्त्याच्या पोह्यांचा लगदा होतोय का? कसे बनवाल चविष्ट आणि सुटसुटीत पोहे, सोप्या टिप्स)

​कांदा बारीक का चिरावा?​

​कांदा बारीक का चिरावा?​

कांद्याची एक विशिष्ट चव असते. ती योग्य पदार्थांमध्ये तितक्याच प्रमाणात असायला हवी. कांद्याचे मोठे तुकडे राहिल्यास योग्य स्वाद येत नाही. त्यामुळे बारीक कांदा चिरल्याने त्याची चव तर लागतेच पण तो पदार्थांमध्ये योग्य पद्धतीने मिक्स होऊन पूर्ण शिजतो.

जेवण करताना सुरूवातील सर्वात जास्त त्रास होतो तो कांदा चिरण्याचा. एकतर कांदा चिरताना डोळ्यातून येणारे पाणी आणि दुसरे म्हणजे कांद्याची पकड योग्य न धरता येणे. आम्ही सांगितलेल्या पद्धतीने कांदा चिरल्यास तुम्ही लवकरच जेवण बनवायला शिकू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …

Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास…; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon Updates) राज्याच वेळेआधीच प्रवेश केला आणि पाहता पाहता तो …