
या ‘एफबीआय’चा अर्थ देखील फडणीसांनी सांगितला आहे. ; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवसही गदारोळात संपला. सरकारी वकील प्रवीण चव्हाण प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे न देता सीआयडीकडे दिल्याने विरोधी पक्ष भाजपाने सभात्याग केला. तर, त्या अगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा एक पेनड्राईव्ह सभागृहात सादर करून आणि वक्फ बोर्डावरील सदस्याचे कसे दाऊशी संबंध आहेत, हे दर्शवून नवा बॉम्ब टाकला.
डणवीसांनी आज पुन्हा एक पेनड्राईव्ह सभागृहात आणल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी “आपण एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का?” असा त्यांना सवाल केला. त्यांच्या या प्रश्नावर फडणवीस यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.
“गृहमंत्र्यांना सांगा की, मी एक एफबीआय काढला आहे ‘ फडणवीस ब्यूरो ऑफि इनव्हेस्टिगेशन ’. विरोधी पक्ष नेत्याचं कामच आहे. विरोधी पक्ष नेत्याकडे सोशित पीडित अशी सगळी लोक असे पुरावे आणून देत असतात. कारण, त्यांना ही अपेक्षा असते की सरकारकडून जिथे अन्याय होतोय, तिथे विरोधी पक्षनेते आपल्याला न्याय मिळून देईल. म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्याकडे येत असतात. अजून आहेत, अजून येणार आहेत, येतीलच. लोक आणूनच देतात. मला मांडाव्याच लागतात माझ कामच आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
“आपण एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का?” ; गृहमंत्री वळसे पाटलांचा विधानसभेत फडणवीसांना सवाल
तर, देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहात आणलेल्या पेनड्राईव्ह वरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना टोला लगावताना, फडणवीसांनी राज ठाकरेंना दिलेल्या पेनड्राईव्हचा देखील उल्लेख केला होता.
“ दाऊदशी संबंधित लोकाच्या संदर्भात या सरकारला विशेष प्रेम दिसतय” ; फडणवीसांनी साधला निशाणा
“ या निमित्त मला आपल्याला एक सांगायाचं आहे, की आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांना ३३ हजार विहिरींचा जलयुक्त शिवारांचा आपण एक पेनड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात एक ६.५ जीबीचा एक पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी आपण एक पेनड्राईव्ह दिला. आज परत आपण पेनड्राईव्ह दिला. म्हणजे आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? ”असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं होतं.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या