11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Motorola चा तगडा Smartphone, लूक आणि फीचर्स जबरदस्त

Motorola New Smartphone : मोटोरोलाना आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक स्मार्टफोन बाजारात आणला आहे. मोटोरोलाने 11 हजारांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो उत्कृष्ट फीचर्ससह येतो. फोनमध्ये 50MP तगडा कॅमेरा, 5000mAh मजबूत बॅटरी आणि मोठी स्क्रीन दिला आहे. Moto G53 ची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

Motorola ने एका इव्हेंटमध्ये Moto X40 फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो Snapdragon 8 Gen 2 सह येतो. याशिवाय, कंपनीने आणखी एक मिड-रेंज स्मार्टफोन सादर केला आहे. यात जबरदस्त फीचर्स आहेत. त्याची किंमतही 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या मॉडेलचे नाव Moto G53 आहे. फोनमध्ये 50MP तगडा कॅमेरा, 5000mAh मजबूत बॅटरी आणि मोठी स्क्रीन आहे.  (हेही वाचा – Nokia चा 10,000 रुपयांत Smartphone,चार्ज केल्यावर 3 दिवस बॅटरी बॅकअप )

Moto g53 ची भारतात किंमत किती?

Moto G53 च्या 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 899 युआन (10,684 रुपये) आहे. 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 1099 युआन ( 13,006 रुपये) आहे. हा फोन दोन रंगात (काळा आणि ग्रे) लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन सध्या फक्त चायना बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. लवकरच हा फोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केला जाईल अशी अपेक्षा आहे. 

हेही वाचा :  Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी

Moto G53 Specifications

Moto G53 ला 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश दर 120HZ आणि 720 x 1600 पिक्सेलचा रिझोल्यूशन आहे. फोनमध्ये 128GB अंतर्गत स्टोरेज आहे, जे 1TB पर्यंत वाढवता येते. डिस्प्ले पंच-होल कटआउट डिझाइनसह येतो.

Moto G53 चा तगडा कॅमेरा

Moto G53 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. समोर एक 8MP सेल्फी शूटर उपलब्ध आहे. हा फोन Android 13 वर चालेल. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Moto G53 ची मजबूत बॅटरी बॅकअप

Moto G53 मध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. Moto G53 हा वजनाने खूप हलका असणार आहे. या फोनचे वजन फक्त 183 ग्रॅम आहे. ते 162.7 x 74.6 x 8.1 mm आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …