‘यांच्याकडून शिकावं लागेल’; विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस

Kohli’s Pathaan Step Viral: अभिनेता  शाहरुख खान (Shah Rukh Khan)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.  बॉलिवूडचा बादशाह अशी शाहरुखची ओळख आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता काही क्रिकेटर्सला देखील पठाणमधील गाण्यांची भूरळ पडली आहे, असं दिसत आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही क्रिकेटर्स डान्स करताना दिसत आहेत. 

विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस 

सोशल मीडियावर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जाडेजा आणि विराट हे क्रिकेटच्या मैदानावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये शाहरुखचं ‘झुमे जो पठाण’ हे गाणं ऐकू येत आहे. हा व्हिडीओ एका नेटकऱ्यानं शेअर करुन लिहिलं, ‘या पठाण डान्सबद्दल काय म्हणशील?’ या व्हिडीओला शाहरुखनं रिप्लाय दिला आहे. 

हेही वाचा :  करिश्मानं पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

शाहरुखच्या रिप्लायनं वेधलं लक्ष 

नेटकऱ्यानं शेअर केलेल्या विराट आणि जाडेजाच्या डान्सच्या व्हिडीओला शाहरुखनं रिप्लाय दिला आहे. शाहरुखनं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘ ते माझ्यापेक्षा जास्त छान डान्स करत आहेत. विराट आणि जाडेजा यांच्याकडून मला शिकावं लागेल.’ शाहरुखच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.

पाहा व्हिडीओ: 

पठाणमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती 

पठाण चित्रपटामधील गाणी हिट ठरली आहेत. या चित्रपटामधील ‘झुमे जो पठाण’ आणि ‘बेशरम रंग’ या दोन गाण्यांवरील रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तर ‘झुमे जो पठाण’ या गाण्यामधील शाहरुखच्या स्टेपनं देखील अनेकांचे लक्ष वेधले.

पठाण हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटामधील अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. शाहरुखचे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

हेही वाचा :  Manasi Naik : 'बघतोय रिक्षावाला...' फेम मानसी नाईकचा घटस्फोट?

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Pathan Fans in Germany: कडाक्याच्या थंडीत जर्मनीमधील चाहते थिरकले ‘झुमे जो पठाण’वर; व्हायरल व्हिडीओला शाहरुखची भन्नाट कमेंट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …