‘बॉयकॉट पठाण’ हॅशटॅग होतोय ट्रेंड; कारण ठरतोय दीपिका, शाहरुखचा ‘हा’ फोटो

Pathaan Movie: गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक चित्रपटांना या ट्रेंडमधून बॉयकॉट केलं जातं. नेटकरी हे चित्रपटातील सिन्स, कलाकार आणि चित्रपटाचे कथानक यांसारख्या कारणांमुळे चित्रपटाला बॉयकॉटची मागणी करतात. आता लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha), ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटांनंतर आता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाला देखील बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. 

भाजप कार्यकर्ते अरुण यादव यांनी बॉयकॉट पठाण हा हॅशटॅग वापरुन एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दीपिका आणि शाहरुख खान यांचा एक फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये अरुण यादव यांनी लिहिलं, ‘पठाण चित्रपटामध्ये दीपिकानं भगव्या रंगाचा पोषाख परिधान केला आहे आणि गाण्याचं नाव बेशरम रंग असं ठेवण्यात आलं आहे. ‘

News Reels

हेही वाचा :  पा. रंजीत यांनी शेअर केला 'चैत्यभूमी' डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर

विश्व हिंदू परिषदेच्या प्राची सादवी यांनी अरुण यादव यांचे ट्वीट रिट्वीट केलं आहे. हे ट्वीट रिट्वीट करत त्यांनी लिहिलं, ‘या चित्रपटावर बंदी आणा. जर तुम्ही या चित्रपटाला बॉयकॉट करत असाल तर हे रिट्वीट करा.’

 पठाणवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

पठाण चित्रपटातील बेशरम गाणे हे बी-ग्रेड गाणं आहे, असा आरोप करत एका नेटकऱ्यानं या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. 

25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pathaan Song Besharam Rang : बेशरम रंग, दीपिकाच्या ग्लॅमरस अदा तर शाहरुखचा स्वॅग; ‘पठाण’ सिनेमातील पहिलं गाणं आऊट

हेही वाचा :  कार्तिकच्या 'शहजादा'चा शाहरुखच्या 'पठाण'ला फटका बसणार?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …