मलायकानं दिला होकार, पण कोणाला? पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मी…’

Malaika Arora: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मलायका ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तसेच डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच मलायकानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला मलायकानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 

मलायकानं नुकताच ब्लॅक आऊटफिटमधील एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, ‘मी होकार दिला.’ मलायकानं  पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टला कमेंट्स केल्या. एका नेटकऱ्यानं कमेंट करुन विचारले, ‘अर्जुन कपूरसोबत लग्न करण्यासाठी होकार दिला?’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘कशासाठी होकार दिला आहेस?’ काही सेलिब्रिटींनी तसेच मलायकाच्या चाहत्यांनी पोस्टला कमेंट करुन मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

तन्नाज इराणी, शमिता शेट्टी, माही विज आणि अदिती गोवित्रिका या कलाकारांनी मलायकाच्या पोस्टला कमेंट करुन मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

मलायकाची पोस्ट


मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. 

हेही वाचा :  ज्या संक्रांतीला पुण्यावर खऱ्यारितीने संक्रांत आली...

मलायकाचा झाला होता घटस्फोट
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.  त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Arjun Kapoor,Malaika Arora : मलायकासोबत लग्नबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अर्जुन कपूरनं दिली पहिली रिअॅक्शन; म्हणाला…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …