‘मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला’; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित

Crime News : बिहारचं (Bihar Crime) प्रशासन आणि पोलीस यंत्रंणा ही कायमच चर्चेत असते. बिहारमध्ये भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच (Bribe) घेण्याची अनेक प्रकरण समोर येत असतात. अशातच बिहारच्या हाजीपूरमधून एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Bihar Police) फोनवर पैशांची मागणी करत आहे. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर फोनवर पैशांची मागणी केल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

बिहारच्या वैशालीचे पोलीस अधीक्षक रवी रंजन यांनी महिला पोलीस अधिकारी पूनम कुमारी यांना फोनवरून पैशांची मागणी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. पूनम कुमारी या महानर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. बुधवारी सकाळी व्हायरल झालेल्या पैशांच्या मागणीची ऑडिओ क्लिप प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी पूनम कुमारी यांना निलंबित केले आहे.

मारहाण प्रकरणात कारवाई करण्यासाठी पूनम कुमारीने 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे. पिंटू कुमारने पुनम कुमारी यांना एकदा 5 हजार रुपये आणि एकदा 10 हजार रुपये दिले होते. तर 10 हजार रुपये बाकी होते. पिंटू कुमारींनी पूनम कुमारीला फोन करून काम कुठपर्यंत आले आहे असे विचारले. त्यावेळी पूनम कुमारी यांनी फोनवर उरलेल्या  पैशांबाबत चर्चा केली. याचीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर पूनम कुमारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा :  वीज कोसळताच 150 वर्षे जुने झाड उन्मळून पडलं अन्... दुर्देवी घटनेत 7 भाविकांचा मृत्यू

दरम्यान, 25 हजारांची रक्कम न मिळाल्याने पूनम कुमारी संतप्त झाल्या होत्या. मी काय हवालदार नाही की तू दिलेल्या पैशांमध्ये तुझं काम करेल. आधी मी सांगितलेले काम पूर्ण कर मग तुझे काम करेन. नाहीतर जे दिलं आहे ते घेऊन जा, असे पूनम कुमारी म्हणाल्या. पूनम कुमारी यांनी तब्येत खराब असल्याचे सांगून बरे झाल्यावर तुझे काम पूर्ण करेल असेही त्यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

29 ऑगस्ट रोजी लावापूर गावातील सिंटू राय आणि रामानंद राय यांच्यात वाद झाला होता. याप्रकरणी महानर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपास अधिकारी पूनम कुमारी होत्या. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्यासाठी त्यांनी फोनवरून पैशांची मागणी केली होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या …