Viral Video: चिमुरडा रस्त्यावर खेळत असतानाच कार अंगावरुन गेली अन् पुढच्या क्षणी….; आश्चर्यकारक VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी डान्स करणारे तर कधी उपदेश देणारे, मनोरंजन करणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामधील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ आठवणींच्या जगात नेतात. पण यातील काही व्हिडीओ मात्र आपल्या भुवया उंचवतात. म्हणजे तर त्या घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या नसत्या तर कोणाचा विश्वासच बसला नसता. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील आहे. येथे एका चिमुरड्याच्या अंगावरुन गाडी जाऊनही तो सुखरुप आहे. आता हे कसं काय शक्य असं तुम्हालाही वाटत असेल ना….पण हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे कार अंगावरुन जाऊनही चिमुरडा उठून धावत सुटतो. 

ऊन सहन होईना म्हणून लेकरु पार्किंगमध्ये जाऊन झोपलं, गाढ झोपेत असतानाच SUV आली अन् पुढच्या क्षणी….

 

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यानुसार, चिमुरडा रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचं दिसत आहे. चिमुरडा जात असतानाच विरुद्द दिशेने एक कार येते आणि चिमुरड्याला धडक देते. यानंतर कार त्याच्या अंगावरुन जाते. सीसीटीव्हीत कारची चाकं तिच्या अंगावरुन जात असल्याचं दिसत आहे. पण यानंतरही चिमुरड्याला काही होत नाही आणि ते उठून रडत रस्त्यावरुन धावत सुटतं. 

हेही वाचा :  वेगाने येणाऱ्या ट्रेनजवळ बाईक घेऊन गेलेल्या व्यक्तीसोबत पुढे घडलं पाहा व्हिडीओ

विशेष म्हणजे रस्त्यावरुन जाणाऱ्यांनाही चिमुरडीच्या अंगावरुन गाडी गेल्याचं कळत नाही. बाजूने जाणारी दुचाकी किंवा इतर कोणीही चिमुरडीकडे पाहत नाही. दरम्यान, चिमुरडीला धडक दिल्यानतंर कारचालकही थांबत नाही आणि तो सुसाट निघून जातो. 

दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. हे कसं काय शक्य आहे अशी विचारणा अनेकजण करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हैदराबादमध्ये 3 वर्षांची चिमुरडी कारखाली आल्याने ठार

हैदराबादमध्ये (Hyderabad) ऊन सहन होत नसल्याने एका इमारतीच्या पार्किंगमध्ये झोपणं चिमुरडीच्या जीवावर बेतलं. पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. 

बाहेर असह्य ऊन असल्याने एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये झोपली होती. यादरम्यान, इमारतीत पार्किंगसाठी आलेली एसयुव्ही अंगावरुन गेल्याने चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना इमारतीच्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. 

हेही वाचा :  Bageshwar Dham : बागेश्वर दरबारच्या समर्थनार्थ आता हिंदुत्ववादी संघटना मैदानात, दुसरीकडे शंकराचार्यांचे थेट आव्हानSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …