angaraki sankashti chaturthi 2023 : अंगारकी चतुर्थीला 5 मिनिटांत बनवा पनीर मोदक…बाप्पाला दाखवा हटके नैवेद्य

Angaraki Sankashti chaturthi 2023 : ही अंगारकी चतुर्थी नववर्षात पहिली अंगारकी आहे त्यामुळे ती खास असणार आहे. गणपती बाप्पा सर्वांचा आवडता असा आहे, आणि बाप्पाला सर्वात जास्त काय आवडतं तर मोदक! आपल्याकडे बाप्पासाठी खास म्हणून मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मोदकांचे बरेच प्रकार आहेत पण मुख्यतः उकडीचे मोदक आपल्याकडे बनवले जातात. 

कोणत्याही महिन्याच्या मंगळवारी जेव्हा संकष्टी येते त्याला अंगारकी चतुर्थी (Angaraki Chaturthi 2023 ) असं म्हटलं जातं.  कलाधिपती आणि ईष्ठ देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या गणपती गजाननाची पूजा करत बाप्पासाठी खास नैवेद्याचा बेत आखला जातो गणपतीला (Ganpati Bappa)  समर्पित असणारा हा उपवास महिला, आपल्या लेकरांच्या सुखासाठी करतात असं म्हटलं जातं. 

बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक अर्पण करतात, सामान्यतः उकडीचे मोदक बनवले जातात पण बऱ्याचदा उकडीचे मोदक सर्वानाच जमतात असं नाही, कधी उकड चुकते (easy modak recipe) कधी साचा बनत नाही तर कधी मोदक फुटू लागतो आणि या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ जातो हे ही तितकंच खरं.  (How to make modak)

बरं मोदकही खायचे आहेत आणि वेळसुद्धा वाचवायचा आहे तर चला आज आपल्या खास सेगमेंट मध्ये घेऊन आलोय 5 मिनिटात होतील असे पनीरचे मोदक आणि हो हे मोदक खायलासुद्धा तितकेच चविष्ठ आणि कमाल लागतात.. (how to make ukdiche modak easy)

हेही वाचा :  LIC ची 'ही' पॉलिसी 30 सप्टेंबरला बंद होणार; तुम्ही यात पैसे गुंतवलेयत का?

पनीर मोदकांची रेसिपी 

साहित्य 

  • * दीड वाटी मावा 
  • * पनीर अर्धा वाटी 
  • * दोन वाट्या पिठी साखर 
  • * इलायची 
  • * पाऊण वाटी खवलेलं खोबर 
  • * केसर 

कृती 

मंद आचेवर कोरडा होईपर्यंत मावा परतून घ्या , पनीर हाताने कुस्करून घ्या आणि केसर घालून २-३ मिनिट परतून घ्या, पनीर थंड झाल्यावर त्यात साखर घाला एकजीव करून घ्या

आणि त्याचे छोटे गोळे तयार करा , आता माव्यामध्ये इलायची पावडर घाला आणि साखर घालून एकजीव करून घ्या, पनीरप्रमाणे मावयाचेसुद्धा गोळे बनवा हे आकाराने थोडे मोठे असावेत

आता या माव्याच्या गोळ्याची पाळी बनवून घ्या आणि पनीरचे मिश्रण त्यात भर आणि मोदकाप्रमाणे आकार द्या. यासाठी तुम्ही मोदक बनवण्याचा साचा सुद्धा वापरू शकता…झटपट आणि स्वादिष्ट मोदक तयार! 

शिवाय तुम्ही तळणीचे मोदक सुद्धा बनवू शकता याला फार वेळ लागत नाही. चपातीच्या पिठाची पुरीएवढी पोळी लाटून त्यात खोबऱ्याचं सारण बनवा आणि मोदक वळून घ्या तो तेलात डीप फ्राय करून घ्या तुमचे मोदक तयार. 

(व्हिडीओ सौजन्य – रुचकर मेजवानी )

चला तर मग आज संकष्टीला पनीरचे मोदक बनवा आणि घरच्यांना खाऊ घाला आणि सर्वांची वाहव्वा मिळवा…

हेही वाचा :  cooking tips: हात खराब न करता चपातीसाठी अशी मळा परफेक्ट कणिक



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …