Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू खूपच कडक होतात का ? असा बनवा गुळाचा पाक…परफेक्ट लाडवांची रेसिपी

Tilgul Recipe for Makar Sankrant : नवीन वर्षाची धमाकेदार सुरवात तर झाली. नवीन वर्ष सुरु व्हायच्याआधीच आपण कोणकोणते सण कोणत्या दिवशी (new year festival list) आहेत हे पाहून घेतो, नवीन वर्षाच्या सुरवातीलाच येणार पहिला सण म्हणजे मकर संक्रात आणि मकर संक्रात म्हटली कि तिळगुळ आलेच. ” तिळगुळ घ्या गोड गोड बोला” म्हणत आपण  जवळच्यांना, मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना तिळगुळ देतो आणि नात्यातला गोडवा जपून राहावा अशा शुभेच्छासुद्धा देतो. 

संक्रातीला तिळगुळच का देतात 

हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण आणि ते साजरा करण्याच्या प्रथेमागे काहींना काही वैज्ञानिक कारण दडलेलं असतं,मकर संक्रांत (MakarSankranti 2023) जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येते.

आणि तेव्हा नेमका थंडीचा जोर बऱ्यापैकी वाढलेला असतो अश्यावेळी शरीरात उष्णता टिकून राहावी यासाठी गरम पदार्थांचं आवर्जून सेवन केलं जातं. (food for winter season)

(Cooking Tips) तिळाचे लाडू खायला स्वादीष्ट तितकेच पौष्टीक असतात. बऱ्याचदा आपण जेव्हा घरी लाडवांचा बेत आखतो तेव्हा ते कधी जास्तच कडक होऊन जातात तर कधी अगदी भुसभुशीत होतात.(How to Make Til Laddo at Home Makar Sankrant 2023 Special Recipe Marathi Cooking Tips)

हेही वाचा :  ऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

पण आता यावर आपल्याकडे एक भारी उपाय आहे, अगदी परफेक्ट तिळाचे लाडू कसे बनवायचे तेही अर्ध्या तासात चला तर मग जाणून घेऊया सोपी आणि झटपट रेसिपी. (Healthy immunity booster til laddu recipe)

तिळाचे लाडू कसे बनवायचे (How to make perfect til laddu)

  • गॅसवर एक पण ठेवा तो व्यवस्थित गरम होऊ द्या, आता त्यात तीळ घाला आणि ते छान खरपूस भाजून घ्या. 
  •  भाजलेले तीळ बाजूला काढून घ्या आता पॅनमध्ये थोडंसं पाणी घाला, आणि त्यात गूळ घालून तो मंद आचेवर वितळेपर्यंत शिजवून घ्या.  
  •  गूळ व्यवस्थितविटल्यावर त्यात  तीळ ,गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या, मिश्रण थोडं गार झाल्यावर  लाडू वळून घ्या, लाडू वळताना एक लक्षात ठेवा हाताला थोडं तेल लावा , हाताला चटका लागणार नाही याकडे लक्ष द्या. 
  •  यात तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे घालू शकता. (How to Make Til Laddo at Home Makar Sankrant 2023 Special Recipe Marathi Cooking Tips)

चला तर मग या संक्रांतीला अगदी परफेक्ट तिळाचे लाडू बनवा आणि इतरांनाही तुमचे लाडू एवढे मस्त कसे झालेत याची रेसिपी सांगूनच टाका. 

हेही वाचा :  Cooking Tips: हवा लागताच 'मऊ होतात पापड? ही Tip वापरून ते पुन्हा करा कुरकुरीत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …