सीए फायनल आणि इंटरच्या निकालासंदर्भात ICAI कडून अपडेट

CA Final, Inter Result 2022-2023: सीए फायनल आणि इंटर नोव्हेंबर २०२२ च्या परीक्षेत बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. द इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया म्हणजेच आयसीएआयने चार्टर्ड अकाऊंट्स (CA) अंतिम परीक्षा नोव्हेंबर २०२२ आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) आंतर परीक्षा नोव्हेंबर २०२२ च्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. संस्थेने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, सीए फायनल आणि इंटर नोव्हेंबर २०२२ परीक्षांचे निकाल १० जानेवारी २०२३ रोजी जाहीर केले जाऊ शकतात.

असा तपासा निकाल

सीए अंतिम निकाल २०२३ आणि सीए इंटर निकाल २०२३ पाहण्यासाठी सर्वप्रथम संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जा. १० जानेवारीपासून वेबसाइटवरील परीक्षा-निकाल विभागात लिंक सक्रिय होईल. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल तपासता येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल आणि गुण तपासण्यासाठी सीए निकाल २०२३ च्या पेजवर त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर तपशील सबमिट करा. यानंतर सीए निकाल नोव्हेंबर २०२२ स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी याची प्रिंट घ्या.

IIT JEE Main:‘आयआयटी जेईई मेन’ लांबणार का?
यापूर्वी आलेल्या विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार सीए इंटर निकाल २०२३ आणि सीए अंतिम निकाल २०२३ जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केले जाईल. दरम्यान दोन्ही अभ्यासक्रमांचे निकाल १० ते १५ जानेवारी दरम्यान घोषित केले जातील असे संस्थेचे अध्यक्ष धीरज खंडेलवाल यांनी जाहीर केले होते. आयसीएआयने २ ते १७ नोव्हेंबर दरम्यान सीए इंटर परीक्षा आणि १ ते १६ नोव्हेंबर दरम्यान सीए फायनलची परीक्षा घेतली होती.

हेही वाचा :  ICSI सीएस प्रोफेशनल २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
Maharashtra Scholarship Results: शिष्यवृत्ती परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …