UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगात बंपर भरती

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अलीकडेच विविध केंद्रीय विभाग आणि संस्थांमध्ये १६० रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार सहाय्यक जलतज्ज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, असिस्टंट केमिस्ट आणि इतरांच्या एकूण १६० पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासाठी, उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट देऊ शकतात. १ डिसेंबर २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

UPSC Job 2022: पात्रता जाणून घ्या

असिस्टंट हायड्रोलॉजिस्ट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून भूविज्ञान किंवा उपयोजित जिओलॉजी किंवा जिओ-एक्सप्लोरेशन किंवा अर्थ सायन्स किंवा रिसोर्स मॅनेजमेंट किंवा हायड्रोलॉजीमध्ये एमएससी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. यासाठी अभियांत्रिकी भूविज्ञान विषयातील एम.टेक उमेदवार देखील अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

ज्युनियर टाईम स्केल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून लेबर लॉ किंवा लेबर वेल्फेअर किंवा इंडस्ट्रियल रिलेशन किंवा कार्मिक मॅनेजमेंटमध्ये पदवी आणि डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. इतर पदांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा :  सीए फायनल आणि इंटरच्या निकालासंदर्भात ICAI कडून अपडेट

PhD Rules: ‘पीएच. डी’च्या नियमांत बदल

पदनिहाय रिक्त पदांची संख्या

वरिष्ठ कृषी अभियंता – ७
कृषी अभियंता – १
सहाय्यक संचालक (कॉर्पोरेट कायदा) – १३
असिस्टंट केमिस्ट – १
सहाय्यक जलतज्ज्ञ – ७०
कनिष्ठ टाइम स्केल – २९
असिस्टंट केमिस्ट – ६
सहाय्यक भूवैज्ञानिक – ९
सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ – १
असिस्टंट केमिस्ट – १४
व्याख्याता (शिक्षण तंत्रज्ञान/संगणक शिक्षण)-१
व्याख्याता (इंग्रजी)-१
व्याख्याता (हिंदी)-१
व्याख्याता (मानवशास्त्र)-१
व्याख्याता (गणित)-१
व्याख्याता (तत्वज्ञान)-१
व्याख्याता (विज्ञान)-१
व्याख्याता (समाजशास्त्र) – १
व्याख्याता (मानसशास्त्र) – १

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय विद्यालयांमध्ये ४,०१४ विविध पदांची भरती, ‘येथे पाठवा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …