विमानात महिला प्रवाशालाच पुसायला लावले रक्ताचे डाग, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

मॉन्ट्रियल येथील कॅनडियन एअरलाइन्सच्या एअर ट्रान्सॅट विमानातील एका महिला प्रवाशाला धक्कादायक अनुभव आला आहे. Birgit Umaigba Omoruyi असं या महिलेचं नाव असून तिेने एक्सवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. महिला सीटवर बसण्यासाठी गेली असता, समोर रक्ताचे डाग पडलेले होते. यानंतर तिने विमानातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. धक्कादायक म्हणजे, यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलेलाच हे डाग पुसण्यास सांगितलं.

महिला नर्स असून तिने शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये सीटसमोरील डाग स्वच्छ करताना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलेला हातात घालण्यासाठी ग्लोव्ह्जही देण्यात आले नव्हत. याउलट विमानतील कर्मचाऱ्याने तिला एक कागद दिला ज्यावर जंतुनाशक मारलेलं नव्हतं. यावर तिने नाराजी जाहीर केली. 

महिलेने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “Dear @airtransat मी बसलेल्या सीटसमोर रक्ताचे डाग होते. मला फ्लाइट अटेंडंटने जंतुनाशक न मारलेले कागद हे डाग पुसण्यासाठी दिले. पण नशीब मी त्यांच्याकडे ग्लोव्ह्ज मागितले आणि नंतर पुसलं. पुढच्या वेळी जर तुम्हाला संपूर्ण विमान स्वच्छ करायचं असेल तर मला फोन करताना संकोच करु नका, जेणेकरुन हे परत होणार नाही”. 

महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने एअरलाइनवर टीका करणं सुरू ठेवले आणि आणखी एक घटना सांगितली. एका कर्मचाऱ्याने 3 तासांच्या विलंबानंतर वॉशरूम वापरण्याची विनंती करणाऱ्या एका कृष्णवर्णीय वृद्ध महिलेला मारहाण केली.

हेही वाचा :  मराठा आरक्षणासंदर्भात मागवलेल्या हरकतींचा अहवाल समोर, 40 टक्के लोकांना वाटतंय...

महिलेने नाराजी व्यक्त करत सांगितलं की, “विमानाने उड्डाण करण्यासाठी 3 तास वाट पाहिल्य़ानंतर, तुमच्या कर्मचाऱ्यांपैकी एकजण कृष्णवर्णीय वृद्धेवर ओरडण्यात व्यग्र होता. कित्येक तास वाट पाहिल्यानंतर त्या महिलेने वॉशरुम वापरण्याची परवानगी मागितली होती. हे पाहणं फारच वाईट होतं. तुमचा व्यवसाय चांगला व्हावा यासाठी हातभार लावणाऱ्यांना तुम्ही चांगली वागणूक द्याल अशी आशा”. दरम्याम महिलेच्या पोस्टनंतरही विमान कंपनीने त्यावर काही उत्तर दिलेलं नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …