शाही विवाहसोहळा

जान्हवीचा हा विवाहसोहळा सगळ्याच अर्थाने शाही होता. ती एका मोठ्या घरातील प्रसिद्ध उद्योगपतीची मुलगी असल्याने साहजिकच तोलामोलाचं सेलिब्रेशन होणार होतेच. सजावट, सर्व व्यवस्था अगदी एखाद्या राजाच्या लग्नात आलो आहोत की काय अशीच होती. या सोहळ्याला मोठमोठे मान्यवर, पाहुणे बोलावण्यात आले होते. खाण्यापिण्याची चंगळ होती. पण या सगळ्यात नवरी मुलगी मात्र सर्वांचे खास लक्ष खेचून घेत होती आणि त्याचे कारण होते तिचा लक्षवेधी लुक!
(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)
पिंक कलर लेहंगा

जान्हवीने आपल्या लग्नासाठी मस्त सुंदर असा गुलाबी रंगाचा लेहंगा निवडला होता. राणी कलरच्या या सेटवर कलरफुट थ्रेड आणि कट दाना एम्ब्रॉइडरी देखील केली गेली होती. स्कर्टला ऐ-कट ठेवून फ्लेयर्स सुद्धा जोडले होते. प्लन्जींग नेक्लाइनचा ब्लाउज आणि मॅचिंग ओढणीसह तिने डोक्यावर गुलाबी रंगाची चुनरी सुद्धा घेतली होती. याला ओव्हरऑल प्लेन ठेवून फक्त बॉर्डरला हेवी एम्ब्रॉइडर्ड ठेवले होते. हा रंग खूप ब्राईट असल्याने जान्हवीला मस्त खुलून दिसत होता आणि ती त्यात अत्यंत गोड भासत होती.
(वाचा :- मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!)
हेवी ज्वेलरी

जान्हवीने लेहंगासोबत अनकट डायमंड आणि एम्रल्डची हेवी ज्वेलरी सुद्धा परिधान केली होती. स्टनिंग नेकपीस सेट सह तिने माथापट्टी, जाड बांगड्या आणि हाथफुल देखील परिधान केले होते. या सर्व दागिन्यांमुळे तिला एकूणच रॉयल टच मिळत होता आणि एखाद्या राजकन्येसारखीच सुंदर ती भासत होती. आयुष्यातील या खास क्षणी नवरा आणि नवरी दोघेही खूप जास्त खुश दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांचा लुक अधिकच गोड करत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील गोड हास्य सर्वानाच भावूक करत होते.
(वाचा :- ब्रालेट ब्लाउज, पातळ कपड्याची साडी आणि वर लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!)
वरमाला घालतानाचा क्षण

या खास क्षणाची वाट सर्वच जोडपी बघत अशतात. अगदी तसंच जान्हवी आणि पुनीत सुद्धा बरेच दिवस या संधीची वाट पाहत होते. या खास प्रसंगी, वधू आणि वर दोघेही खूपच आनंदी दिसत होते, फोटोतला त्यांचा आनंदही ओसंडून वाहताना दिसतो आहे. जे त्यांच्या लुकला एक रॉयल टच देत होतं.
18 वर्षांची मेहनत

जान्हवी गुटखा किंग रसिकलाल यांची मुलगी, लहानपणापासून श्रीमंतीत वाढलेली आणि राजेशाही थाटात जगलेली! जेव्हा पुनीतने तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. लग्नाच्या निमित्ताने त्याने आपल्या इंस्टा अकाऊंटवर आपल्या भावना शेअर केल्या आणि त्यात तो म्हणाला की, त्याला जान्हवीचा होकार मिळवण्यासाठी तब्बल 18 वर्षे मेहनत घ्यावी लागली. आज 18 वर्षांनी तिने अखेर पुनीतला होकार दिला आणि दोघांचे प्रेम लग्नात परावर्तीत झाले.
(वाचा :- लता मंगेशकरांनी का नेसल्या आयुष्यभर फक्त पांढ-याच रंगाच्या साड्या? छोट्याश्या वयातील निर्णयावर शेवटच्या श्वासापर्यंत राहिल्या ठाम..!)
दोघेही आहेत सेटल्ड

जान्हवी आणि पुनीत दोघेही आपापल्या करियर मध्ये सेटल्ड असून दोघांनी एकमेकांचा स्वभाव आणि प्रेम पाहूनच लग्न केलं आहे. जान्हवी ही आज माणिकचंद ऑक्सिसरिजचची सीएमडी म्हणून काम पाहते आहे. तर पुनीत हा मराठी चित्रपटांसाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहतो. जान्हवी ही जरी मोठ्या घरात वाढलेली असलेली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती साधीच राहते. लग्नानंतर दोघांनी आपल्या फ्रेंड्ससाठी एक खास पार्टी थ्रो केली होती. तेव्हा पुनीतने शेअर केलेल्या फोटोज मध्ये दोघे अगदी साध्या लुक मध्ये नॉर्मल कपल्स सारखेच दिसून आले. जान्हवी स्वत: सुद्धा पैश्यापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारी असून पुनीत सारखा जोडीदार तिच्याशी मॅच करतो आणि म्हणूनच तिने पुनीतची जोडीदार म्हणून निवड केली असे ती आवर्जून सांगते.
(वाचा :- ऐश्वर्या रायसोबत चश्म्यामध्ये दिसणारी छोटीशी मुलगी आज आहे सर्वात हॉट-बोल्ड अभिनेत्री, मादकतेसमोर ग्लॅमरस अभिनेत्रीही पडल्या फिक्या..!)