Gangubai Kathaiwadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाच्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले व्यंगचित्र

Gangubai Kathaiwadi Success : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathaiwadi) सिनेमा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. अमूल नेहमीच ट्रेंडिग विषयांच्या जाहीराती सोशल मीडियावर शेअर करत असतात. आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत  47.12 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता अमूलदेखील ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाच्या यशात सहभागी झाला आहे.

‘खालिया बटर’ असे विचारत अमूलने ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. खालिया बटर हे सिनेमात मुख्य भूमिका असलेल्या आलिया भट्टच्या नावासोबत मिळते जुळते आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आलिया भट्टनेदेखील हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.



‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाने चांगलाच धमाका केला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा 25 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. गेल्या चार दिवसांत या सिनेमाने 47.12 कोटींची कमाई केली आहे. 

‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचे लेखन हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमात आलिया भट्टसह अजय देवगण, जिम सरभ आणि शंतनू महेश्वरीदेखील मुख्य भूमिकेत आहेत. विकेण्डलादेखील या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 

हेही वाचा :  शिझान खानला दिलासा नाही

संबंधित बातम्या

Gangubai Kathaiwadi Collection Day 4 : बॉक्स ऑफिसवर ‘गंगुबाई काठियावाडी’ची जादू, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

Maha Shivratri 2022: हेमा मालिनी, कंगना रनौत, मौनी रॉयसह ‘या’ अभिनेत्रींनी दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Mahesh Manjrekar : ‘पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका’, महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …